क्रीडागडचिरोलीविदर्भ

गडचिरोलीत जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेचा थरार, नवोदित खेळाडूंचे यश

१६व्या जिल्हास्तरीय अजिंक्यपद स्पर्धेचे आ. डॉ. मिलिंद नरोटे यांच्या हस्ते उद्घाटन

गडचिरोली: गडचिरोली जिल्हा अ‍ॅमेच्युअर क्रीडा कराटे-डो असोसिएशनच्या वतीने ७ सप्टेंबर २०२५ रोजी स्थानीय प्रसन्न हॉल येथे १६ वी जिल्हास्तरीय अजिंक्यपद कराटे स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत गडचिरोली जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील शेकडो खेळाडूंनी सहभाग घेऊन आपले कौशल्य दाखवले.

स्पर्धेचे उद्घाटन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या हस्ते झाले. यावेळी अध्यक्षस्थानी गडचिरोली जिल्हा अ‍ॅमेच्युअर क्रीडा कराटे-डो असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत वाघरे होते. प्रमुख पाहुण्यांमध्ये दैनिक भास्करचे जिल्हा प्रतिनिधी रुपराज वाकोडे, राज्य क्रीडा मार्गदर्शक सुप्रसिद्ध बडकेलवार, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश भांडेकर, सकाळचे जिल्हा प्रतिनिधी मिलिंद उमरे, अविनाश वरगंटीवार तसेच संदीप भांड (सहाय्यक आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

ही स्पर्धा ६ ते २१ वर्षे वयोगटातील मुला-मुलींच्या विविध वजन गटात घेण्यात आली. यात सब-ज्युनियर मुली: प्रथम क्रमांक – दीपेश्री इंगुलकर, द्वितीय – सुरभी इंगुलकर, तृतीय – आर्या चहांदे. सब-ज्युनियर मुले: प्रथम क्रमांक – सार्थक नेरकर, द्वितीय – प्रेम देशमुख, तृतीय – आर्यन बावणे. सिनियर मुली: प्रथम क्रमांक – आरोही चव्हाण, द्वितीय – लावण्या कोवे, तृतीय – चेतना वाईलकर. सिनियर मुले: प्रथम क्रमांक – प्रथम कोरे, द्वितीय – सार्थक गेडाम, तर तृतीय क्रमांक क्रिश घोगरे याने पटकावला.

या स्पर्धेत प्रेम देशमुख याने ‘उत्कृष्ट कराटेपटू’चा बहुमान पटकावला, तर ‘उत्कृष्ट काता कराटेपटू’ म्हणून प्रिशा काबरा आणि सार्थक नेरकर यांचा गौरव करण्यात आला. ‘सर्वात उत्कृष्ट टीम’ म्हणून गोंडवाना सैनिकी विद्यालय, गडचिरोली यांनी विजेतेपद पटकावले. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी पंच आणि रेफ्रींनी मोलाची भूमिका बजावली. खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय आपले प्रशिक्षक, आई-वडील आणि गडचिरोलीच्या जनतेला दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button