गडचिरोलीचंद्रपूरमहाराष्ट्रविदर्भ
चंद्रपूर परिमंडलाच्या मुख्य अभियंतापदी हरीश गजबे रुजू

चंद्रपूर : महावितरणच्या चंद्रपूर परिमंडलाच्या मुख्य अभियंतापदाची सुत्रे हरीश पुंडलीकराव गजबे यांनी नुकतीच स्वीकारली.
महावितरणच्या नागपूर येथील प्रादेशिक कार्यालयात अधिक्षक अभियंता या पदावरुन पदोन्नतीवर हरीश गजबे यांची चंद्रपूर परिमंडलाच्या मुख्य अभियंतापदी नियूक्ती झाली असून या पदाची सुत्रे नुकतीच स्विकारली. यावेळी चंद्रपूर परिमंडलाअंतर्गत असलेल्या चंद्रपूर आणि गडचिरोली मंडलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी हरीश गजबे यांचे त्यांच्या पदोन्नतीबाबत स्वागत केले व पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या. विज ग्राहकांना सर्वतोपरी सेवा देत महावितरणला अधिकाधिक लोकाभिमुख करुन चंद्रपूर परिमंडलाला प्रगतीपथावर नेण्याचा मानस यावेळी त्यांनी व्यक्त केला.



