गडचिरोलीविदर्भ

शहर विचार मंचच्या वतीने गुणवंत विद्यार्थिनीचा सत्कार

​कूरखेडा : स्थानिक विद्याभारती कनिष्ठ महाविद्यालयाची विज्ञान शाखेची विद्यार्थिनी मंतशा सिराजखां पठाण हिने बारावीच्या परीक्षेत महाविद्यालयातून तृतीय क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन केले. तिच्या या यशाची दखल घेत ‘शहर विचार मंच, कूरखेडा’ च्या वतीने तिचा जाहीर सत्कार करण्यात आला.

१५ मे रोजी आयोजित या छोटेखानी समारंभात मंतशा पठाण हिचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी तिचे तोंड गोड करून तिला पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कूरखेडा तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी अशाच प्रकारे जिद्दीने शिक्षण घेऊन शहराचे नाव उज्ज्वल करावे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

​या सत्कार समारंभाला शहर विचार मंचाचे अध्यक्ष माधवदास निरंकारी, माजी नगराध्यक्ष रवींद्र गोटेफोडे, नगरसेवक ॲड. उमेश वालदे, प्रा. किशोर खोपे, डॉ. प्रा. दशरथ आदे, उपसरपंच राम लांजेवार, डॉ. जगदीश बोरकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मोनेश मेश्राम, मधूकर बोबाटे, सिराज पठाण आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. ​मंतशाच्या या यशामुळे तिचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, पदवी शिक्षणासाठी तिने घेतलेल्या परिश्रमाचे फळ मिळाल्याची प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button