वर्धाविदर्भ

कंटेनरची उभ्या ट्रकला धडक ; कंटेनर जळून राख

दोघे जखमी ; जाम परिसरातील घटना

समुद्रपूर : भरधाव कंटेनरने रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली. या अपघातात कंटेनरने पेट घेतल्याने त्यात वाहून नेत असलेले लाखो रुपयांचे साहित्य जळून राख झाले, तर दोघे जण गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवार, १२ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास तालुक्यातील जाम परिसरात घडली.

चालक अलताफ अली, रा. इलाहाबाद, वाहक दीपक कुमारपाल अशी जखमीची नावे आहे. गुडगाव दिल्ली येथे एचआर ५५ एएम ३६२१ क्रमांकाचा कंटेनर हैदराबादवरून चप्पल, पर्स बेंग पॅकेट, रेनकोट, लेडीज जेंट्स गारमेंट, काजू पॅकेट आदी कुरिअरच्या वस्तू घेऊन गुडगाव येथे जाण्यासाठी निघाला होता. दरम्यान, जाम परिसरात रस्त्याच्या बाजूला बंद स्थितीत असलेल्या सीजी १३ एलएल ४९३६ क्रमांकाच्या उभ्या असलेल्या ट्रकला या कंटनेरने मागून धडक दिली.

या अपघातात कंटेनरला आग लागली. त्यामध्ये चालक अलताफ अली, वाहक दीपक कुमारपाल दोन्ही गंभीर जखमी झाले. घटना लक्षात येताच स्थानिकांनी घटनेची माहिती पोलिसांना तसेच हिंगणघाट अग्निशामक विभागाला दिली. हिंगणघाटवरून अग्निशामक दलाल पाचारण करण्यात आले. मात्र, ते पोहोचेपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले. यात कंटेनरमध्ये असलेल्या वस्तू खाक झाल्या.

घटनेची माहिती मिळताच पोलिस कर्मचारी मनोज कोसूरकर, आशिष कांबळे, जितेंद्र वैद्य, रमाकांत साळवे यांनी घटनास्थळी जाऊन जखमींना हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. स्थिती नाजूक असल्याने त्यांना वर्धा येथे हलविण्यात आले. यासंबंधी समुद्रपूर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button