
माजी आ. कृष्णा गजबे यांच्या हस्ते हिरवी झेंडी; विविध प्रश्नांवर होणार चर्चा
देसाईगंज : राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या १० व्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी देसाईगंज (वडसा) येथील पदाधिकारी सोमवारी (दि.४) गोव्याला रवाना झाले. माजी आमदार कृष्णा गजबे यांनी त्यांच्या वाहनांना हिरवी झेंडी दाखवून त्यांना शुभेच्छा दिल्या. हे अधिवेशन ७ ऑगस्ट रोजी गोव्यातील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये होणार आहे.
माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या कार्यालयासमोर अधिवेशनासाठी निघालेल्या वाहनांचे पूजन करण्यात आले. या वेळी गजबे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत अधिवेशनाच्या यशस्वी वाटचालीस प्रोत्साहन दिले.
या अधिवेशनात ओबीसी समाजाच्या विविध प्रश्नांवर आणि धोरणांवर सखोल चर्चा अपेक्षित आहे. ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी आणि मागण्यांसाठी हे अधिवेशन महत्त्वाचे मानले जात आहे.
याप्रसंगी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे तालुकाध्यक्ष महेश झरकर, तसेच सुनील पारधी, वसंता दोनाडकर, नेताजी तुपट, सुरेंद्र ढोरे, शंकर पारधी, आदित्य मिसार, संजय बगमारे, हिरालाल शेंडे, कैलास पारधी, योगेश्वर राऊत, गणेश चिंचोळकर, सहसचिव भास्कर बन्सोड, माणीक बन्सोड, चक्रधर नाकाडे, मेघनाथ दुनेदार, मोहन गायकवाड, गोपाल दर्वे, कैलास कुथे, चंद्रकांत रणदिवे, विनोद बुध्दे, मेघश्याम डांगे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



