गडचिरोलीमहाराष्ट्रविदर्भ

३३ केव्ही विद्युत उपकेंद्रासाठी रास्ता रोको आंदोलन

अहेरी : तालुक्यातील पेरमिली येथे मंजूर असलेल्या ३३ केव्ही उपकेंद्राचे बांधकाम सुरू करण्याच्या मागणीसाठी येथील मुख्य रस्त्यावर बुधवारी रास्ता रोको आंदोलन करून मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले. त्यामुळे काही कालावधीसाठी वाहतूक ठप्प होती.

पेरमिली येथे ३३ केव्हीचे वीज उपकेंद्र २०२३-२४ मध्ये मंजूर करण्यात आले. वीज उपकेंद्राचे काम वर्षाच्या सुरुवातीलाच सुरू होणार होते. मात्र, ६ महिन्यांचा कालावधी उलटूनही अजूनपर्यंत कामाला सुरुवात झाली नाही. उपकेंद्राचे काम लवकर सुरू करावे, यासाठी जिल्हाधिकारी संजय दैने यांना निवेदन देण्यात आले होते. दरम्यान, आंदोलनाचाही इशारा दिला होता; परंतु उपकेंद्राचे काम सुरू करण्याबाबत कोणत्याही हालचाली दिसून आल्या नाहीत. अखेर बुधवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

आंदोलनाचे नेतृत्व डॉ. शंकर दुर्गे व आसिफ खान पठाण यांनी केले. आंदोलनात माजी सरपंच प्रमोद आत्राम, सरपंच किरण नैताम, मेडपल्लीचे सरपंच नीलेश वेलादी, श्रीनिवास बंडमवार, संदीप दुर्गे, लतिका दहागावकर, कविश्वर चंदनखेडे, शंकर कुंभारे, सपना बंडमवार, तुळशीराम चंदनखेडे यांच्यासह बहुसंख्य नागरिकांचा सहभाग होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button