एस.बी. महाविद्यालयात जागतिक योग दिन साजरा

अहेरी : येथील श्री. शंकरराव बेझलवार कला-वाणिज्य महाविद्यालयात प्राचार्य डॉ. विजय सोमकुंवर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, शारीरिक शिक्षण विभाग व नेहरू युवा केंद्र अहेरी यांच्या संयुक्त विद्यमाने २१ जून रोजी जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. योग दिवसाचे औचित्य साधून योग शिक्षक किशोर वाचामी व नारायण सिडाम यांनी योग संबंधित मार्गदर्शन करताना नियमित योगा केल्याने निरोगी जीवन कसे जगता येईल या बद्दल मार्गदर्शन केले, तसेच योग प्रात्याक्षिकाचे धडे देवून योगाचे महत्त्व समजून सांगितले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य डॉ. नागसेन मेश्राम, योग पतंजलीचे रापरतीवर, प्रा. डॉ. जी.डी. जंगमवार, प्रा. मंगला बनसोड, प्रा. दीपक उतरवार, प्रा. डी.एम. आवारी, प्रा. एस.आर. लांडे, डॉ. रूपा घोनमोडे, सचिन कष्टी, दत्तू जाकेवार, बबन पेंदोर, प्रतीक शिंपी, राकेश वाघाडे व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी प्रा. सी.एन. गौरकार व प्रा. पी.व्ही. घोडेस्वार यांनी प्रयत्न केले.



