चंद्रपूरमहाराष्ट्रविदर्भ

व्यसनमुक्ती केंद्रात रुग्णाने घेतला गळफास

चंद्रपूर : शहरातील बाबूपेठ व्यसनमुक्ती केंद्रात उपचारार्थ दाखल असलेल्या रुग्णाने शौचालयात लुंगीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास उघडकीस आली. सचिन जनार्धन शिगरपवार (४२ हल्ली मुक्काम नेरी, मूळ गाव तेलंगणा) असे आत्महत्या करणाऱ्या रुग्णांचे नाव आहे.

सचिन आपल्या कुटुंबासह रोजगाराच्या शोधात नेरी येथे वास्तव्यास आला होता. त्याला दारूचे व्यसन असल्याने कुटुंबियांनी त्याला दारु सोडण्यासाठी चंद्रपूर शहरातील बाबूपेठ येथील झेप व्यसनमुक्ती केंद्रात मागील काही दिवसांपूर्वी दाखल केले होते. मात्र, तो मानसिक विवंचनेत होता. यातूनच त्याने सोमवारी लुंगीने शौचालयात गळफास घेऊन आत्महत्या केली.

घटनेची माहिती रामनगर पोलिसांना होताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मर्ग दाखल केला. प्राथमिक तपास पोलिस उपनिरीक्षक राजू बलगेवार यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button