
गडचिरोली : पोलिस विभागाने जिल्ह्यातील १२ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. याबाबतचे परिपत्रक ३० जून रोजी निर्गमित करण्यात आले आहे. दुसरीकडे जिल्ह्यात एकाही नवीन पोलिस निरीक्षकाला जिल्ह्यात नियुक्ती दिली नाही.
बदली झालेल्यांमध्ये सुजीत चव्हाण, विलास नाळे, महेश मेश्राम, प्रमोद बानबले, विश्वास जाधव, किरण मानभव, अरविंदकुमार कतलाम, श्याम गव्हाणे, अमोल फडतरे यांचा समावेश आहे. रेवचंद सिंगनगुळे, निर्मला किन्नाके, रवींद्र येरचे यांना जिल्ह्यातच मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रमोद बानबले यांची चंद्रपूर जिल्ह्यात, अरविंदकुमार कतलाम यांची नागपूर ग्रामीण, सुजित चव्हाण यांची मुंबई शहर, विलास नाळे, महेश मेश्राम, विश्वास जाधव यांची पुणे ग्रामीण या ठिकाणी बदली झाली.



