भंडारामहाराष्ट्रविदर्भ

विजेचा धक्का लागून पहिलीतील विद्यार्थिनीचा मृत्यू

पुयार येथील धक्कादायक घटना

भंडारा : शाळेत गेलेल्या एका पहिली वर्गातील विद्यार्थिनीला शाळेतीलच स्वच्छतागृहात विजेचा धक्का लागल्याने तिचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना बुधवार, ३ जुलै रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील पुयार येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत घडली. यशस्वी सोपान राऊत (६ वर्षे) असे मृत बालिकेचे नाव आहे.

यशस्वी हिने यावर्षी गावातीलच जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत इयत्ता पहिल्या वर्गात प्रवेश घेतला होता. १ जुलै रोजी नवीन सत्राच्या शाळा सुरू झाल्या. यशस्वी पहिल्या दिवसापासून शाळेत नियमित हजर होती. बुधवारी सकाळी यशस्वी शाळेत गेली. शाळेत गेल्यानंतर ती स्वच्छतागृहात गेली असता तिथे पडलेल्या सॅनिटरी पॅड डिस्पोज करणाऱ्या ताराला तिचा स्पर्श होऊन जागीच मृत्यू झाला. अन्य विद्यार्थीनी या स्वच्छतागृहात गेल्या असता त्यांना यशस्वी पडलेल्या अवस्थेत आढळून आली. विद्यार्थीनींनी या घटनेची माहिती शिक्षकांना दिली. शिक्षकांनी तिला तातडीने उपचारासाठी लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले.

या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. शाळेत विद्यार्थीनीचा मृत्यू झाल्याची माहती गावात पसरताच अनेकांनी गर्दी केली. आपली मुले सुरक्षित आहेत का, याची अनेक पालक चौकशी करताना दिसले. या प्रकाराबद्दल गावकऱ्यांकडून संताप व्यक्त होत आहे.

पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून चौकशी सुरु केली आहे. सॅनिटरी पॅड डिस्पोज करणाऱ्या मशिनचा विद्युत पुरवठा सदोष होता, अशी प्राथमिक माहिती पुढे आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button