
गडचिरोली : गोंडवाना सैनिकी माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालय गडचिरोली येथे भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्थेच्या माजी अध्यक्ष स्व. स्नेहादेवी धर्मरावबाबा आत्राम यांची जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य ओमप्रकाश संग्रामे हे होते तर अतिथी म्हणून पर्यवेक्षक अजय वानखेडे हे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्व. स्नेहादेवी धर्मरावबाबा आत्राम यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीप प्रज्वलित करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सांग्रामे यांनी स्व. स्नेहादेवी धर्मरावबाबा आत्राम यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.



