गडचिरोलीविदर्भ

दोन तालुक्याला जोडणारा नरेंद्रपूर ते अंबेला मार्ग तात्काळ मंजूर करण्यात यावा

राष्ट्रीय मानवाधिकार संघटना प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे यांची मागणी

चामोर्शी : तालुक्यातील नरेंद्रपूर येथील गावातूनच जाणारा चार किलोमीटरचा गावाबाहेरचा रस्ता थेट अंबेला येथे मुलचेरा तालुक्याला जाऊन जोडतो आणि सदर रस्त्यावर स्वातंत्र्याचे इतक्या वर्षापासून साधे खडीकरण सुध्दा झाले नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांना कालीनगरमार्गे अथवा घोट निकतवाडा मार्गातून मुलचेरा तालुक्यात जावे लागते. सदर मार्गाबाबत गावकरी बांधवांनी आजपर्यंत अनेकदा लोकप्रतिनिधी व संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला. परंतु आजपर्यंत सदर रस्ता पूर्ण झाला नाही? आणि आजपर्यंत गावातून जाणारा हा रस्ता तसाच आहे. तसेच या मार्गामुळे शेजारच्या वीस-पंचवीस गावाचा थेट संपर्क मूलचेरा तालुक्याशी होईल व याबाबत गावकरी बांधवांनी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे यांना माहिती दिली.

त्यांनी या विषयाची तात्काळ दखल घेतली व गावात जाऊन सदर रस्त्याची पाहणी केली व सदर मागणी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना केले व पुढील बजेटमध्ये सदर रस्ता मंजूर करण्याची मागणी गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार मिलिंद नरोटे यांना केली व थेट आमदार महोदय यांच्यासोबत भ्रमणध्वनीवर संवाद साधला. यावेळी गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी सदर रस्त्याचे कार्य तात्काळ करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार संघटना जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, घोट येथील मानवाधिकार संघटना पदाधिकारी नानू उपाध्ये, शुभंकर चक्रवर्ती, स्थानिक भाजपा पदाधिकारी किशोर कुंडू, मनोज तरफदार, दूलाल मंडल, अरुण ढाली, गोविंद जोद्दार, तपन हलदार व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button