चंद्रपूरमहाराष्ट्रविदर्भ

अज्ञात वाहनाच्या धडकेत वेकोलि कामगाराचा मृत्यू

सास्ती-बल्लारपूर मार्गावरील पुलावरील घटना

बल्लारपूर : येथील सास्ती पुलाजवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने वेकोलि कामगाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. २) सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. सचिन अशोक पत्तीवार (वय ४५) रा. तुकूम, चंद्रपूर असे मृतकाचे नाव आहे.

वेकोलि कामगार सचिन पत्तीवार हे एम.एच. ३४ ए.वाय. ०३४९ क्रमांकाच्या चंद्रपुरातून दुचाकीने कर्तव्यावर जात होत होते. दरम्यान, सास्ती पुलाजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत पत्तीवार हे जागीच ठार झाले. हा भीषण अपघात पुलावरील खराब रस्त्याने झाल्याचा आरोप करून घटनास्थळावरील नागरिकांनी मृतदेह उचलण्यास विरोध केला. अपघाताच्या घटना वाढत असूनही संबंधित विभागाने दुर्लक्ष करीत आहे. परिणामी कामगाराचा हकनाक बळी गेला, असे संतप्त जमावाचे म्हणणे होते. अखेर पोलिसांनी गर्दीला पांगवून रुग्णवाहिकेतून मृतदेह बल्लापूर रुग्णालयात आणला. त्यानंतर शवविच्छेदन करून कुटुंबीयांकडे सोपविले.

सचिन पत्तीवार यांच्या दुर्दैवी मृत्यूने तुकूम परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. बल्लारपूर पोलिसांनी अज्ञात वाहन-चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक आसिफराजा शेख यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक प्रेमशाह सोयाम, कैलास आदे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button