गडचिरोलीविदर्भ

‘पोलीस दादालोरा खिडकी’ अंतर्गत व्हि.एल.ई. साठी एकदिवसीय कार्यशाळा

३७ प्रशिक्षणार्थ्यांची उपस्थिती 

गडचिरोली: गडचिरोली पोलीस दलाच्या ‘पोलीस दादालोरा खिडकी’ उपक्रमांतर्गत, पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार, १७ जुलै रोजी पोलीस मुख्यालय, एकलव्य हॉल येथे दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कार्यरत ‘व्हिलेज लेव्हल एंटरप्रेन्योर’ (VLE) युवक-युवतींसाठी एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

या कार्यशाळेत एकूण ३७ VLE प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. त्यांना कॉमन सर्विस सेंटर (CSC) द्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची सखोल माहिती देण्यात आली. या प्रशिक्षणामुळे दुर्गम भागातील नागरिकांना त्यांच्या घरांपर्यंत बँक सेवा, आयुष्यमान भारत कार्ड, आभा कार्ड, बचत खाते, ई-श्रम कार्ड, पेन्शन सेवा, विमा, लाडकी बहीण योजना आणि पीक विमा योजना यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देणे अधिक सोयीचे होणार आहे.

कार्यक्रमाप्रसंगी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी उपस्थित VLEs ना मार्गदर्शन करताना सांगितले की, “सर्व VLEs नी आपापल्या कार्यक्षेत्रातील नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा. अतिदुर्गम भागातील शेवटच्या नागरिकापर्यंत पोहोचून जास्तीत जास्त लोकांना या योजनांचा फायदा करून द्या. अतिदुर्गम भागातील नागरिकांसाठी तुम्हीच प्रशासनाचा चेहरा आहात, ही जबाबदारी ओळखून आपण सर्वांनी दुर्गम भागात काम करावे.”

यानंतर, कार्यक्रमाला उपस्थित असलेले जिल्हा व्यवस्थापक CSC गडचिरोली स्वप्नील सोनटक्के, प्रधानमंत्री फसल विमा योजना गडचिरोलीचे जिल्हा प्रतिनिधी राकेश रायलालवार आणि आयुष्यमान भारत योजना, गडचिरोलीचे जिल्हा प्रतिनिधी सुमेध आजेगावकर यांनीही उपस्थित सर्व VLEs ना मार्गदर्शन केले.

गडचिरोली पोलीस दलाच्या ‘पोलीस दादालोरा खिडकी’ अंतर्गत ‘प्रोजेक्ट प्रगती’, ‘प्रोजेक्ट विकास’, ‘प्रोजेक्ट उडाण’, ‘प्रोजेक्ट उत्थान’ आणि ‘प्रोजेक्ट कृषी समृद्धी’ या उपक्रमांच्या माध्यमातून, पोस्टे/उपपोस्टे/पोमकें स्तरावर काम करणारे कम्युनिटी पोलीसिंग अंमलदार आणि VLEs यांच्या संयुक्त प्रयत्नाने आजवर एकूण १०,४६,२८४ नागरिकांपर्यंत विविध शासकीय योजनांचा लाभ पोहोचवणे शक्य झाले आहे.

या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्ह्यांतील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत शेळके आणि सर्व पोलीस अंमलदार यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button