गडचिरोलीविदर्भ

45 हजारांचा मुद्देमाल जप्त, तिघांवर गुन्हा दाखल

बेतकाठी परिसरात कारवाई

गडचिरोली : कोरची पोलिसांनी बेतकाठी जंगल परिसरात मोहीम राबवून दारुअड्डे नष्ट करीत 45 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी तीन जणांवर गुन्हे दाखल केल्याची कारवाई 10 सप्टेंबर रोजी केली.

बेतकाठी येथे अवैधरीत्या जंगल परीसरात दारू गाळण्याचे काम सुरू असल्याची माहिती मुक्तीपथ कोरची टीमला मिळताच समन्वय साधुन कोरची पोलीसांनी पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनात पोलिस पथकाने जंगल परीसरात विशेष मोहीम राबवित 3 दारूचे अड्डे उध्वस्त केले. अवैध दारू अड्डयावरून एकुण 45 हजाराच्या गावठी दारूसह दारू गाळण्याचे साहीत्य नष्ट केले गेले. गावात कोणत्याही प्रकारे दारू गाळली व विक्री केली जाऊ नये यासाठी गावात माहिती देण्यात आली. मुक्तिपथ गावसंघटना सदस्यांना सुद्धा असे आढल्यास पोलिसांना, मुक्तिपथ तालुका टीमला संपर्क करावा अशी माहिती देण्यात आली. याप्रकरणी विजय जगेश्वर गंगबोईर, संतोष बरातु सरपा, जुगेश शुकालु घरघसीया या तिघांवर गुन्हे नोंद करण्यात आले.

ही कारवाई पोलिस निरीक्षक शैलेश ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली  पोउपनी गावडे, स.फौजदार किशोर राउत, पोहवा नैताम, धिरज हलामी, आशिक पाल, रेवनाथ गेडाम यांनी केली. या मोहिमेमुळे इतर दारूविक्रत्यांमधे धाक निर्माण झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button