क्राईमगोंदियाविदर्भ

अनैतिक संबंधाच्या संशयातून खून ; आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

गोंदिया : पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय घेऊन काठीने मारून तरुणाचा खून करणाऱ्या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप व पाच हजार रुपये द्रव्यदंडाची शिक्षा ठोठावली आहे. ही सुनावणी जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायधीश खोसे यांनी शुक्रवारी (दि.१२) केली असून आपला निकाल सुनावला आहे. प्रल्हाद बिसराम कुंजाम (४५, रा. मगरडोह) असे आरोपीचे नाव आहे.

चिचगड पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम मगरडोह येथील रहिवासी ललित उदाराम उईके (३२) याचे आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय घेत आरोपी प्रल्हाद कुंजाम याने १ ऑगस्ट २०२१ रोजी रात्री ९:३० वाजतादरम्यान ललित उईकेच्या घरात प्रवेश करून त्याच्या छातीवर लाकडाने मारून ठार केले होते. चिचगड पोलिसांनी आरोपीवर भादंवि. कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक अतुल तवाडे, शरद पाटील यांनी केला होता. या तपासात पोलीस अधीक्षक निखिल पिंगडे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील, चिचगडचे ठाणेदार काळेल यांनी खून प्रकरणात उत्कृष्ट तपास करणारे व मदत करणाऱ्यांचे कौतूक केले.

गुन्ह्याच्या तपासात आरोपीविरुद्ध सबळ साक्ष, पुरावे, परिस्थितीजन्य पुरावे गोळा करण्यात आले. आरोपीविरुद्ध दोष निष्पन्न झाल्याने जिल्हा व सत्र न्यायाधीश खोसे यांनी आरोपीला भादंवि. कलम ३०२ अंतर्गत जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा, तर दंड न भरल्यास एक वर्षाचा सश्रम कारावास. कलम ४५२ अंतर्गत तीन वर्षांचा सश्रम कारावास आणि दोन हजार रुपये दंड ठोठावला आहे, तसेच दंड न भरल्यास पाच महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. याप्रकरणात सरकारी वकील कैलास खंडेलवाल यांनी सरकारची बाजू मांडली. न्यायालयीन कामकाजासाठी महिला पोलिस हवालदार रिम्पी हुकरे यांनी सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button