गडचिरोलीविदर्भ

महात्मा गांधी महाविद्यालयात “एक पेड माँ के नाम” उपक्रमांतर्गत वृक्षारोपण

आरमोरी : स्थानिक महात्मा गांधी कला, विज्ञान व स्व.न.पं. वाणिज्य महाविद्यालय, आरमोरी येथे भारत देश व जगभरातील सर्व नागरिकांना मातृत्व आणि पर्यावरण संवर्धनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “एक पेड माँ के नाम” हा उपक्रम सुरू केला आहे. यानिमित्त महात्मा गांधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने “एक पेड माँ के नाम” या उपक्रमांतर्गत महाविद्यालय परिसरामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबविण्यात आला. त्यामध्ये नीम, जांभूळ, रिठा आंबा अशा विविध प्रजातीच्या वृक्षांच्या रोपट्यांची लागवड करण्यात आली.

याप्रसंगी मनोहरभाई शिक्षण प्रसारक मंडळ, आरमोरीचे सचिव मनोज वनमाळी, दिपक बेहरे, हरिश्चंद्र बोंदरे, केशवराव कुंभारे, दिपक वनमाळी, मयूर वनमाळी, राजू गारोडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा, महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य साईनाथ अद्दलवर, स्व. वत्सलभाई वनमाळी स्कुल ऑफ स्कॉलरचे प्राचार्य नितीन कासार, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. गजेंद्र कढव, सहकार्यक्रम अधिकारी प्रा. सुनंदा कुमरे, डॉ. वसंता कहालकर, डॉ. विजय गोरडे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम स्व. वत्सलाबाई वनमाळी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button