गोंदियाविदर्भ

जागतिक लोकसंख्या दिनानिमीत्त जिल्हा न्यायालयात जनजागृती कार्यक्रम

गोंदिया : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय, जिल्हा वकील संघ व एस.एस.गर्ल्स महाविद्यालय गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक लोकसंख्या दिवस, मुलांचे हक्क, बाल न्याय, शिक्षणाचा अधिकार, बेटी बचाओ-बेटी पढाओ व पोस्को ॲक्ट’ दिनानिमीत्त 11 जुलै 2024 रोजी जिल्हा न्यायालय गोंदिया येथे जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव एन.के. वाळके, लोक अभिरक्षक कार्यालय प्रमुख ॲड. शबाना अंसारी, एस.एस.गर्ल्स महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. रेखा लिल्हारे उपस्थित होते.

यावेळी एन.के. वाळके यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत संवाद करुन वाढत्या लोकसंख्याचे दुष्परिणाम तसेच स्त्री व पुरुषांच्या कामाची तुलना करुन स्त्री हे पुरुषांपेक्षा जास्त शक्तीशाली आहे असे सांगितले. तसेच विद्यार्थ्यांसोबत दिलखुलास चर्चा करुन त्यांचे जीवनातील लक्ष्य विचारुन विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविले.

ॲड. शबाना अंसारी यांनी समाजामध्ये स्त्रीयांवर होणारे शोषण व अत्त्याचार या विषयावर बोलताना स्त्रीयांमध्ये शिक्षणाचे अभाव हे स्त्रीयांच्या शोषणाचे प्रमुख कारण आहे असे सांगितले व पोस्को ॲक्ट कायद्यावर विद्यार्थ्यांना माहिती दिली. प्राचार्य डॉ.रेखा लिल्हारे यांनी बेटी बचाओ-बेटी पढाओ या शासकीय उपक्रमाचे फायदे व पोस्को ॲक्ट चा उपयोग व जनजागृती समाजामध्ये केली पाहिजे असे सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. निता खांडेकर यांनी केले. सुत्रसंचालन डॉ. दिशा गेडाम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरीता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथील कर्मचारी अधीक्षक पी.बी. अनकर, कनिष्ठ लिपीक ए.एम. गजापुरे, एस.एम. कठाणे, पी.एन. गजभिये, एस.डी. गेडाम, पी.डी. जेंगठे, के.एस. चौरे, एल.ए. दर्वे, लेखापाल आलेशान मेश्राम, शिपाई बी.डब्ल्यू. पारधी, आर.ए. मेन्ढे, सरतिमा भगत यांनी मोलाचे सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button