गोंदियाविदर्भ

शेतशिवारात वीज पडून वृद्ध ठार

कोरंबी येथील घटना

गोंदिया : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ग्राम कोरंबी शेतशिवारात वीज पडून वृद्ध ठार झाल्याची घटना रविवारी (दि. १४) रात्री घडली. शंभू दोडकू नाकाडे (६५) असे वीज पडून ठार झालेल्या वृद्धाचे नाव आहे.

रविवारी (दि.१४) तालुक्यात सर्वत्र विजेच्या कडकडाटासह पावसाने चांगलाच कहर केला. अशात कोरंबी निवासी शंभू नाकाडे सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान म्हैस आणण्यासाठी अरततोंडी येथील शेतात गेले असता, वीज पडून ते जागीच ठार झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी शेतात त्यांचा मृतदेह मिळून आला. अर्जुनी- मोरगाव पोलिसांना माहिती होतात त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व उत्तरीय तपासणी करून सोमवारी मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन केले. रविवारी झालेल्या वादळ वाऱ्यासह वीज पडून अर्जुनी-मोरगाव तालुक्यात एक दुधाळ म्हैस सुद्धा जागीच ठार झाल्याची घटना घडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button