गडचिरोलीविदर्भ

तालुक्यात झालेल्या कामांची माहिती बूथ व जनतेपर्यंत पोहचवा – आ. डॉ. देवराव होळी

धानोरा येथे भाजपा तालुका व शहर पदाधिकारी कार्यकारिणी बैठक

धानोरा : मागील ७५ वर्षाच्या काळात कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणावर धानोरा तालुक्यात कामे झालीत. मात्र त्या झालेल्या कामांची माहिती आपल्या बुथापर्यंत व जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी आपण कुठेतरी कमी पडल्याने लोकसभेत पराभव स्विकारावा लागला. त्यामुळे येणाऱ्या काळात आपण केलेले काम बूथ व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी धानोरा येथे भाजपा तालुका व शहर कार्यकारणीच्या बैठकीप्रसंगी केले.

यावेळी माजी खासदार अशोक नेते, माजी आ. डॉ. नामदेवराव उसेंडी, लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, भाजपा नेत्या चंदा कोडवते, डॉ. कोडवते, भाजपा तालुका अध्यक्ष लता पुंघाटी, शहर अध्यक्ष सारंग साळवे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शशीकांत साळवे, नगरसेवक संजू कुंडू, यांचेसह तालुक्यातील बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख व पदाधिकारी  उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button