
गोरेगाव : आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी क्षेत्रातील चिल्हाटी, तुमखेडा आणि मोहगाव येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये वृक्षारोपण करून विद्यार्थ्यांना वही वाटप करुन आपला वाढदिवस साजरा केला.
पंकज रहांगडाले यांनी सोशल मिडियावर वाढदिवसाच्या दिवशी हार, फुले पुष्पगुच्छ न आणता शालेय साहित्य घेऊन येण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक हितचिंतकांनी त्यांना शालेय साहित्य भेटवस्तू म्हणून दिले. ज्याचे वाटप गरजू विद्यार्थ्यांना केले जाणार आहे. आपल्याकडून विद्यार्थ्यांना भेटवस्तू म्हणून पंकज रहांगडाले यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना वही वाटप केले.
यावेळी चिल्हाटी येथील कार्यक्रमात मनोज बोपचे, रविन्द्र पटले, फणिंद्र पटले, नलिनी बिसेन, धनराज टेंभरे, विलास पटले, मानसिंग ठाकुर, माणिक पारधी, विमला ठाकुर, रमेश सिलेवार, लालचंद चौहान, भूषण ठाकुर, यशवंत ठाकुर, दिलीप बोपचे, तुमखेडा येथील कार्यक्रमात रंजुकुमार येळे, योगेश रुद्रकार, घनश्याम पटले, डॉ. होमेन्द्र रहांगडाले, उमेशकुमार ठाकुर, प्रमेश्वर प्रधान, बाबाराव बन्सोड, महेन्द रहांगडाले, मुकेश बेलगे, गिरीश रहांगडाले, सोमेश्वर बोपचे, यशवंत वानखेड़े, विजय पटले, सुनील शरणागत, योगेश शहारे, सर्व आंगनवाड़ी सेविका, सर्व महिला बचत गट सी.आर.पी., सर्व आरोग्य सेविका व समस्त गावकरी आणि मोहगाव येथील कार्यक्रमात गेंदलाल हरिणखेडे, कमलेश रहांगडाले, सीता रहांगडाले, गणराज पटले, शिक्षक आणि कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.



