चंद्रपूरविदर्भ

चंद्रपूर जिल्ह्यात नदी-नाल्यांना पूर ; पुरात तिघे वाहून गेले

अनेक मार्ग बंद

चंद्रपूर : जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी, नाल्याना पूर आला असून शनिवार, २० जुलैला नागभीड तालुक्यातील विलम रोडवर असलेल्या नाल्याला आलेल्या पुरात कुणाल प्रमोद बावणे (११) हा पाचव्या वर्गात जनता विद्यालय नागभीड येथे शिकणारा मुलगा वाहून गेला तर नागभीड तालुक्यातील बोथली येथील स्वप्नील दोनोडे हा पूर बघायला गेला असता तोल जाऊन पाण्यात पडल्याने बुडून त्याचा मृत्यू झाला. भद्रावती तालुक्यातील खुटवंडा तुकूम या नाल्यावर आलेल्या पुरात १९ जुलैला अनिल केशवराव पेंदाम हा २० वर्षीय युवक वाहून गेला.

चंद्रपूर जिल्ह्यात नदी, नाल्यांना आलेल्या पुरात तिघांना जलसमाधी मिळाल्याने जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली असून प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button