
गडचिरोली : स्थानिक गोंडवाना सैनिकी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्सहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे उपप्राचार्य ओमप्रकाश संग्रामे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून पर्यवेक्षक अजय वानखेडे, भूपेंद्र चौधरी, डॉ. राकेश चडगुलवार किशोरलाल साठवणे, प्रशांत म्हशाखेत्री, शंकर दासरवार, संतोष कुळमेथे हे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महर्षी व्यास यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दिप प्रज्वलित करण्यात आले.
याप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले तर काहींनी गुरुपौर्णिमेनिमित्त भाषण सादर केले. गुरुपौर्णिमा का साजरी करतात या बद्दल विशेष मार्गदर्शन अजय वानखेडे, डॉ. राकेश चडगुलवार भूपेंद्र चौधरी यांनी केले तर गुरुची महिती सांगताना प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन केले.
गुरु हे फक्त मानवच असतात असे नाही तर माझ्या मते निसर्ग, एखादे निर्जिव वस्तूदेखिल एखद्याचे गुरु असू शकतात ज्या पासून आपल्याला काही शिकायला मिळते असे सर्वच आपले गुरु असतात असे मत उपप्राचार्य ओमप्रकाश संग्रामे यांनी व्यक्त केले. पुढे ते म्हणाले की जिवनात यशस्वी व्हायचे असेल तर प्रत्येकाला गुरु असणे आवश्यक आहे. पौराणिक काळामध्ये गुरु शिष्याचे जे नाते होते ते मात्र आज फार कमी प्रमानात पहायला मिळते, शिवाय प्रत्येक गुरुला त्यांचा शिष्य हा उज्वल झालेला पाहायला आवडते. असेही ते म्हणाले. संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन समर खोबे यांनी केले. कार्यक्रमला सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.



