क्राईमगडचिरोलीविदर्भ

अवैध सागवान बेडसह २१ सागवान पाट्या जप्त

तिघांवर वनगुन्हा दाखल

एटापल्ली : एटापल्ली पासून अवघ्या ९ किलोमिटर अंतरावर असलेल्या तोडसा येथे अवैधरित्या सागवानी बेड तयार केल्या जात असल्याची माहिती मिळताच एटापल्ली येथील वनपरीक्षेत्र कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तोडसा येथील तोंदे कटिया गावडे याच्या घरी धाड टाकुन बेडसह सागवान माल जप्त केला.

गोपनीय माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी निलीमा खोब्रागडे यांनी त्वरित धाड टाकुन एक सागवानी बेडसह २१ नग सागवानी पाट्या असा एकुण ०.२२४ घन मिटर लाकुड व बेड बनविण्यासाठी वापरतात ते सुतारी अवजारे जप्त करून मुळ मालक व दोन सुतार अशा तिघांवर वन गुन्हा दाखल केला. पुढील तपास वनपरीक्षेत्र अधिकारी एन.के. खोब्रागडे यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button