गडचिरोलीविदर्भ

गोंडवाना सैनिकी विद्यालयात कारगिल विजय दिवस साजरा

गडचिरोली : स्थानिक गोंडवाना सैनिकी विद्यालयात २६ जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे उपप्राचार्य ओमप्रकाश संग्रामे  हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून सैनिकी निदेशक नामदेव प्रधान, प्रा. डॉ. राकेश चडगुलवार, ज्येष्ठ शिक्षक किशोरलाल साठवणे, प्रशांत म्हशाखेत्री, शंकर दासरवार हे होते तर प्रमुख वक्ता म्हणून प्रा. गजानन ढोले हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते कारगिल विजय दिवसाच्या रेखाटलेल्या चित्रासमोर कारगिल युद्धातील शहीद जवानांना पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली.

प्रसंगी कारगिल विजय दिवस हि भारताच्या इतिहासातील सुवर्णक्षरांनी लिहिण्यासारखी घटना आहे, २५ वर्षापूर्वी आजच्या दिवशी म्हणजे २६ जुलै १९९९ रोजी भारतीय जवानांनी पाकिस्तानी सैन्याला धूळ चारून कारगिलच्या पर्वातरांगावर पुन्हा आपला तिरंगा फडकवला, या युद्धादरम्यान अनेक वीर जवानांना स्वताच्या प्राणांची आहुती सुद्धा द्यावी लागली. विशेष म्हणजे पाकिस्तानी घुसखोरांनी भारतीय सीमा ओलांडून भारताच्या हद्दीतील अनेक ठिकाणी कब्जा केल्याचे भारताच्या लक्षात आले व या घुसखोरांना हुसकावण्यासाठी कारगिलचे युद्ध सुरू झाले. ही ठाणी कारगिल व द्रास परिसरातील अतिउंच दुर्गम जागी होती. अनेक महिन्यांच्या प्रयत्‍नांनंतर म्हणजेच २६ जुलै १९९९ रोजी  भारताला ही ठाणी पूर्णता परत मिळवण्यात यश मिळाले. यात अनेक जवानांना हौतात्मा पत्करावे लागले, त्यांच्या या कार्यातुन प्रत्येकाने काहीतरी शिकले पाहिजे, व देशसेवा हि मना मनात रुजविले पाहिजे असे मत कार्यक्रमाचे प्रवक्ते प्रा. गजानन ढोले यांनी मांडले.

भारताच्या इतिहासात या दिवसाला खूप महत्त्व आहे. भारतीय सशस्त्र दलांच्या शौर्य, धैर्य आणि अतुलनीय समर्पणाला सलाम करण्याची आणि त्यांचे स्मरण करण्याची ही सर्व नागरिकांना संधी आहे. भारतीय सैन्य देशाच्या सार्वभौमत्वाचे आणि अखंडतेचे रक्षण करते. भारताचे लोक व पंतप्रधान दरवर्षी इंडिया गेट येथील अमर जवान ज्योती येथे सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करतात. खरतर भारताच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी आणि लोकांचे रक्षण करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. कारगिल विजय दिवस हा एक महत्त्वपूर्ण आणि गंभीर वार्षिक उत्सव आहे जो कारगिल युद्धातील शूर वीरांना सन्मानित करतो. हे सशस्त्र दलांनी केलेल्या बलिदानाचे स्मरण आणि राष्ट्राचे रक्षण करण्यासाठी महत्वपूर्ण आहे मातृभूमीचे रक्षण आणि देशवासीयांच्या सुरक्षेसाठी सर्वोच्च त्याग ,प्राणांचे बलिदान देणाऱ्या शूर सैनिकांचे स्मरण करतो व कारगिल विजय दिनानिमित्य शहीद जवानांना विनम्र अभिवादन करतो. या शब्दात उपप्राचार्य ओमप्रकाश संग्रामे यांनी माहिती दिली.

प्रसंगी विद्यालयातील कृष्णा आम्बोरकर, अथर्थ गिरडकर, यश देवारे, यश सोमंकर, वत्सल चाकीनारापावार, कृतार्थ गोस्वामी, सम्यक खांद्गुरे, चैतन्य मगरे, विद्यार्थ्यांनी कारगिल विजय दिवसानिमित्य भाषणे दिले, तर आदेश सुरमवार, रुद्धीशाकुमार कोलावार, या विद्यार्थ्यांनी कविता सादर केली. विद्यार्थ्यांकडून देशभक्ती नृत्याद्वारे शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली. संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन सम्यक फुलझेले यांनी तर योग नैताम यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button