गडचिरोलीविदर्भ

शासकीय विज्ञान महाविद्यालयात कायदेविषयक शिक्षण शिबिराचे आयोजन

गडचिरोली : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे समान किमान कार्यक्रमानुसार माहे जुलै-२०२४ मध्ये ” हुंडा, जातिभेद व स्त्री भ्रूण हत्या व इतर सामाजिक दुष्कृत्ये” या विषयावर कार्यक्रम घेणेबाबत निर्देश दिलेले होते. त्याअनुषंगाने प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष विकास एस. कुलकर्णी यांचे आदेशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोलीतर्फे ०३ ऑगस्ट रोजी सकाळी ११.०० वाजता शासकिय विज्ञान महाविद्यालय, गडचिरोली येथे कायदेविषयक शिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले.

कायदेविषयक शिक्षण शिबीरास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर.आर. पाटील, सहाय्यक लोक अभिरक्षक अ‍ॅड. स्नेहा आनंदराव मेश्राम,  शासकिय विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य प्रकाश शं. जाखी आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रकाश शं. जाखी यांनी केले तर अ‍ॅड. स्नेहा मेश्राम यांनी उपस्थितांना हुंडा, जातिभेद व स्त्री भ्रूण हत्या यांचे बाबत माहिती दिली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर.आर. पाटील यांनी उपस्थितांना हुंडा, जातिभेद व स्त्री भ्रूण हत्या त्याचप्रमाणे समाजात चालणाऱ्या वाईट चालीरिती व त्यावर उपाययोजना या बाबत कायदेविषयक माहिती दिली.

कायदेविषयक शिक्षण शिबिराचे संचालन प्राध्यापक प्रकाश सिरसाट यांनी करून उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी वरिष्ठ लिपीक एन.आर. भलमे, कनिष्ठ लिपीक जे.एम. भोयर आणि शिपाई एस.एस. नंदावार यांनी अथक परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button