भंडाराविदर्भ

युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या लाभार्थ्यांना आ. राजू कारेमोरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्राचे वाटप

भंडारा : जिल्हयातील सुशिक्षित बेरोजगार युवक व युवतींना खाजगी क्षेत्रात रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा या उददेशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र भंडारा आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था तुमसर यांचे संयुक्त विद्यमाने आज आयोजित मेळाव्यात आमदार राजू कारेमोरे यांच्या हस्ते सहा उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था तुमसर या ठिकाणी पंडित दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळावा आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना माहिती व मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आला होता. या रोजगार मेळाव्यात जिल्हयातील व जिल्हाबाहेरील नामांकित 6 कंपन्या उपस्थित होत्या. या रोजगार मेळाव्या प्रसंगी 550 उमेदवार उपस्थित होते.

त्यापैकी एकूण 220 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यामध्ये 212 उमेदवारांनी प्रत्यक्ष, 8 उमेदवारांनी गुगल फॉर्मदवारे मेळाव्यासाठी नोंदणी केली होती. रोजगार मेळाव्यात एकूण 147 उमेदवारांनी मुलाखती दिल्या असून 20 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. तसेच स्वयंरोजगाराच्या योजनांची माहिती देण्याकरीता उपस्थित खादी ग्रामोद्योग मंडळ, दिव्यांग महामंडळ, महात्मा फुले महामंडळ यांच्याकडून 268 उमेदवारांनी स्वयंरोजगाराबाबत माहिती घेतली.

सदर मेळाव्याच्या ठिकाणी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत 34 उमेदवारांनी स्टॉल वर नोंदणी केली. सदर योजनेअंतर्गत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, भंडारा -1, मानिंग आयटीआय तुमसर-2, सहयोग सहकारी पत संस्था मर्या-3 असे एकूण 6 उमेदवारांची निवड करुन आमदार राजू कारेमोरे यांचे हस्ते नियुक्ती पत्राचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमात मोहाडी पं.स. सभापती रितेश वासनिक, जिल्हा कौशल्य विकास केंद्राचे सहायक आयुक्त सुधाकर झळके, शासकीय आयटीआयचे प्राचार्य अरुण डोंगरे, जिल्हा समन्वयक सुहास बोंदरे, पंकज भुते, यासिन छावरे, आकाश गोदारे आदी उपस्थित होते.

आमदार राजू कारेमोरे यांनी विधानसभा क्षेत्रातील जास्तीत जास्त युवक युवतींना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगीतले. सुधाकर झळके यांनी युवक-युवतींनी नोकरी प्राप्त करुन आपले कौशल्य विकसीत करुन आपले कुटूंबाचे उदरनिर्वाह करावे असे मार्गदर्शन केले. सुहास बोंदरे यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांची सविस्तर माहिती उपस्थित महिला उमेदवारांना दिली तसेच सदर योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी सहायक आयुक्त सुधाकर झळके यांचे मार्गदर्शनाखाली कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी भाऊराव निंबार्ते, जिल्हा कौशल्य विकास समन्वयक सोनु उके, वरिष्ठ लिपीक श.क. सय्यद, वरिष्ठ लिपीक आशालता वालदे, वरिष्ठ लिपीक प्रिया माकोडे, सुहास बोंदरे, आय.जी. माटूरकर तसेच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील कर्मचाऱ्यांनी अथक परीश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button