क्राईमगडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

सेवानिवृत्त परिचारिकेच्या घरात घुसुन जबरी चोरी करणाऱ्या चार आरोपींना अटक

गुन्हयात 01 विधीसंघर्षग्रस्त बालकासह 03 आरोपींचा सहभाग

गडचिरोली : आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव (नवीन) येथे राहणाऱ्या सेवानिवृत्त परिचारिकेच्या घरी जबरी चोरी करणाऱ्या चार आरोपींना आरमोरी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींमध्ये अंकित भिमराव लटारे (वय 24) रा. ठाणेगाव, प्रशांत विलास राऊत (वय 22) रा. रामाळा, प्रतिक राजु भुरसे (वय 23) रा. ठाणेगाव व एका विधीसंघर्षग्रस्त बालकाचा समावेश आहे.

आरमोरी पोलीस ठाणे येथुन 03 किमी अंतरावर असलेल्या ठाणेगाव (नवीन) येथे राहणाऱ्या सेवानिवृत्त परिचारीकेच्या घरात 29 जुलै रोजीचे 10.45 ते 12.30 वा. सुमारास 03 अज्ञात चोरटयांनी प्रवेश करुन त्यांचे हातपाय खुर्चीला बांधुन त्यांच्या घरातील कपाटामध्ये, ड्रेसींग टेबल येथे ठेवलेले व त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने तसेच हातात असलेली सोनाटा कंपनीची वॉच असा एकुण तीन लाख एकोणपन्नास हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जबरीने चोरुन नेला आहे, असे फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरुन पोलीस ठाणे आरमोरी येथे अपराध क्र. 209/2024 कलम 309(4), 306(क), 3(5) भारतीय न्याय संहिता अन्वये अज्ञात चोरटयांविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदर गुन्हयाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी, गडचिरोली सुरज जगताप यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोलीचे पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी व त्यांचे अधिकारी व अंमलदार तसेच पोस्टे आरमोरी पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवुन तंत्रशुध्द पध्दतीने करुन सदर गुन्हयातील अज्ञात चोरट्याचा शोध लावला असुन यातील आरोपी अंकित भिमराव लटारे, प्रशांत विलास राऊत यांना 06 ऑगस्ट रोजी व यातील फरार आरोपी प्रतिक राजु भुरसे याचा शोध घेवुन आरमोरी पोलीसांनी त्यास 07 ऑगस्ट रोजी जेरबंद केले आहे. तसेच सदर गुन्हयात सहभागी असलेला १७ वर्षीय  विधीसंघर्षग्रस्त बालक रा. ठाणेगाव यास ताब्यात घेवुन त्याला बालसुधारगृहात रवाना करण्यात आले.

गुन्हयातील तिन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाकडुन सदर आरोपींना 12 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. अटक आरोपितांकडे गन्हयाच्या अनुषंगाने अधिक चौकशी केली असता आरोपी अंकित भिमराव लटारे हा सदर गुन्हयाचा प्रमुख सुत्रधार असल्याचे निष्पन्न झाले. सदर गुन्हयातील मुद्देमाल छत्तीसगड राज्यातील भिलाई येथे लपवुन ठेवला असल्याचे निष्पन्न झाल्याने सदर मुद्देमाल आरोपींकडुन हस्तगत करण्यात आला. तसेच अटक आरोपितांचा यापुर्वी सुध्दा अशाच प्रकारच्या आणखी कोणकोणत्या गुन्हयात सहभाग होता याबाबत पोलीस दलाकडुन कसुन शोध घेण्यात येत आहे. गुन्हयाचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे आरमोरीचे पोउपनि विजय चलाख हे करीत आहेत.

सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि उल्हास भुसारी, पोस्टे आरमोरीचे प्रभारी अधिकारी पोनि विनोद रहागंडाले, स्थानिक गुन्हे शाखेचे व पोस्टे आरमोरी अधिकारी व अंमलदार यांनी पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button