गडचिरोलीविदर्भ

चामोर्शी-मूल मार्गावर रास्तारोको आंदोलन

रस्त्यावरील खड्ड्यात लावली बेशरमाची झाडे

प्रशासनाने तात्काळ दखल घेतल्याने आंदोलन मागे

चामोर्शी : चामोर्शी ते भेंडाळा-हरणघाट-मूल मार्गावरील काही भागात काम पूर्ण न झाल्यामुळे जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी चामोर्शी येथील डांबर प्लांटसमोरील चाकलपेठ फाट्यासमोर शुक्रवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी रस्त्यावरील खड्ड्यात बेशरमाचे झाडही लावण्यात आले. दरम्यान प्रशासनाने तात्काळ दखल घेत काम सुरू करण्याचे आश्वासन दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले.

यावेळी पोलीस निरीक्षक पुल्लुरवार यांनी आंदोलनकर्त्यांची समजूत काढली. तहसीलदार घारुडे, नायब तहसीलदार वैद्य व उपविभागीय अभियंता बड्डे, उपअभियंता लिल्हारे यांनी रास्ता रोको आंदोलनास भेट देऊन निवेदन स्वीकारले आणि रस्त्याच्या दुरुस्तीचे काम उद्यापासून सुरू करण्याचे आश्वासन दिले. तालुका प्रशासनाच्या सकारात्मक भूमिकेमुळे सदर आंदोलन स्थगित करण्यात आले.

सदर आंदोलनाचे नेतृत्व नगरसेवक आशिष पिपरे, राष्ट्रीय लोकहित सेवा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रमेश अधिकारी, काळी पिवळी चालक-मालक संघटनेचे अमर पठाण यांच्या नेतृत्वात करण्यात आले. यावेळी शहरातील स्वाभिमान संघटनेचे यशवंत त्रिकांडे, दिवाकर कोहळे, राजू धोडरे, युवा नेते शुभम भांडेकर, चाकलपेठचे सरपंच सुनील रामगोनवार, युवा संकल्प संस्थेचे अध्यक्ष सुरज नैताम, ट्रॅव्हल्स असोसिएशनचे उत्तम स्वर्णकार, राणा वैद्य, चेतन वडेट्टीवार, मंगेश सदुलवार, फिरोज खान, रक्षित खंडाळे, राहुल सदूलवार, गोपाल घागरतवार, दिलीप राय, मंगेश सदुलवार, नितीन चन्नावार, पिंकू खंडाळे, प्रवीण चन्नावार, प्रेमचंद गेडाम व गावातील नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button