
गडचिरोली : जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून आमदार डॉ. देवराव होळी व मित्र परिवाराच्या वतीने गडचिरोली येथे भव्य खुल्या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेमध्ये मुलांमधून नागपूरच्या सौरभ अशोक तिवारी प्रथम तर मुलींमधून रिमा राजेश धोतरे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. यावेळी विजेत्यांना रोख रकमेसह शील्ड व प्रमाणपत्र देऊन आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते गौरविण्यात आले. सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकाचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी अभिनंदन केले.
मॅरेथॉन स्पर्धेमध्ये गडचिरोलीसह चंद्रपूर, नागपूर येथील मुला-मुलींनी उत्साहाने सहभाग घेतला. यावेळी मुलांमध्ये द्वितीय क्रमांक राजन यादव तृतीय गौरव खोडतकर, चौथा नागेश्वर रस्से, पाचवा लोमेश शेंडे तर राहुल हरीनखेडे यांनी सहावा क्रमांक पटकावला तर मुलींमध्ये द्वितीय आरती भगत, तृतीय आचल कुडुकर, चौथे अंजली मडावी, पाचवी तेजस्विनी कांबळे, सहावी पायल मांदाडे यांनी क्रमांक पटकाविला. यावेळी लक्ष वेधून घेणाऱ्या सहभागी लहान मुलांना प्रोत्साहनपर बक्षीसही देण्यात आले.
कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या आपल्या मित्रपरिवाराचे, क्रीडा विभागाचे अधिकारी व शिक्षकांचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी आभार मानले.



