गोंदियाविदर्भ

जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त आरोग्य विभागातील ११० कर्मचाऱ्यांचा गौरव

तालुकास्तरावर 15 ऑगस्ट रोजी 75 कर्मचाऱ्यांना गौरविणार

तीन डॉक्टरांना जीवन गौरव पुरस्कार    

गोंदिया : जिल्हा परिषद सभागृहातील वसंतराव नाईक सभागृहात आरोग्य विभाग व के.टी.एस. रुग्णालय यांच्या एकत्रित सहकार्याने जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधुन राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात उत्कृष्ट कामगिरी करणारे जिल्हास्तरावरील आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिक्षक, अधिपरिचारिका, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहायिका, आशा सेविका, स्टाफ नर्स असे एकुण 110 अधिकारी व कर्मचाऱ्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच 3 सर्जन डॉक्टरांना त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत दहा हजाराच्यावर कुटुंब कल्याण स्त्री/पुरुष नसबंदी शस्त्रक्रीया केल्याबद्दल जिल्हा आरोग्य प्रशासनामार्फत जीवन गौरव पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात आले.

पुरस्कार वितरण सोहळ्याचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम यांनी केले. यावेळी जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती योपेंद्रसिंग टेंभरे, जिल्हा परिषद सदस्य तथा आरोग्य समितीच्या सदस्य छाया नागपुरे, प्रविण पटले, जिल्हा परिषद सदस्य नंदेश्वर यांचेसह जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमरीश मोहबे, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अरविंदकुमार वाघमारे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. निरजंन अग्रवाल, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक अर्चना वानखेडे उपस्थित होते. सर्वप्रथम जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने क्रांतिकारी बिरसा मुंडा व आरोग्याची देवता धन्वंतरी माता यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन वंदन करण्यात आले.

याप्रसंगी एम. मुरुगानंथम म्हणाले, भारताने लोकसंख्येत चीनला मागे टाकले आहे. आता भारत जगात लोकसंख्येबाबत प्रथम क्रमांकावर पोहचला आहे. 18 व्या शतकात भारताची लोकसंख्या 12 कोटी होती. ती आता 142 कोटी झाली आहे. भारतील लोकसंख्येचा प्रवास वेगाने वाढला आहे. पण या समस्यांचा विचार करून त्या हाताबाहेर जाण्याआधी वेळीच कशा रोखता येतील याचा विचार होणे आणि त्याबाबत ठोस पावले उचलणे ही काळाची ज्वलंत गरज ठरेल. यामध्ये लोकसंख्येच्या वाढीला आळा घालणे, राष्ट्रीय साधनसंपत्तीचे योग्य नियोजन, काही अत्यावश्यक नवे प्रकल्प उभारणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दूरदृष्टीने कायदे पालनाची स्वयंशिस्त जनतेमध्ये निर्माण होणे या गोष्टी गरजेचे आहे.

लोकसंख्येचे नियोजन बाबत भारताच्या बाबतीत बोलायचे झाले तर 1952 मध्येच वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी आणि अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी कुटुंब नियोजनाला राष्ट्रीय कार्यक्रम म्हणून जाहीर करण्यात आले. तसेच लग्नाचे वय 18 वर्षे केल्याचे हा सुद्धा त्याचा भाग आहे. बालमृत्यूचे प्रमाण रोखणे यासाठी सर्वांना योग्य लसीकरण, उत्तम वैद्यकीय उपचार, कुपोषण, साथीचे आजार अशा टाळता येण्याजोग्या बालमृत्यूच्या कारणांचे निवारण केल्यास जन्मदर कमी करता येईल. कुटुंब नियोजनाची साधने यात निरोध, तांबी, गर्भनिरोधक गोळ्या ही साधने, कायदेशीर गर्भपाताच्या सोयी या कानाकोप-यात गावपातळीवर जनजागृती करण्यात यावे. राष्ट्रीय कार्यक्रमात जन्मानंतर तांबी बसविणे, लाभार्थिच्या ईच्छेनुसार एका अपत्यानुसार पाहिजे तेवढे अंतर ठेवण्यासाठी कॉपर-टी व गर्भनिरोधक गोळ्या, अंतरा ईंजेक्शन लावण्याबाबत लाभार्थ्यांना प्रवृत्त करणे, कायम स्वरुपी कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया करून घेणे ई. विविध पर्याय उपलब्ध करुन घेणे आवश्यक असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे यांनी प्रास्ताविकात सांगितले.

प्राथमिक आरोग्य केंद्र वडेगावचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अभय पाटील, ग्रामीण रुग्णालय गोरेगावचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. पुरुषोत्तम पटले व ग्रामीण रुग्णालय सडक अर्जुनीचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. दीपक धूमनखेडे या तिघांनी त्यांच्या प्रदिर्घ सेवेच्या कारकिर्दीत दहा हजाराच्यावर कुटुंब कल्याण स्त्री/पुरुष नसबंदी शस्त्रक्रीया केल्याबद्दल जिल्हा आरोग्य प्रशासनामार्फत त्यांच्या कार्याबद्दल जीवन गौरव पुरस्कार देवुन सन्मानचिन्ह, मेडल व प्रमाणपत्र देवुन सन्मानित करण्यात आले.

बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. नीतिका पोयाम, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. गगन गुप्ता, डॉ. नंदा गेडाम, डॉ. आनंद गजभिये, डॉ. रत्नमाला रामटेके, डॉ. हर्षा अहिर, डॉ. नलिनी येळे, डॉ. पूजा हुकरे, डॉ. राहुल शेंडे, डॉ. सिद्धांत शहारे, डॉ. कुलदीप बघेले, डॉ. सुधीर राऊत, डॉ. कुणाल नाकाडे, डॉ. कीर्ती चुलपार, डॉ. पिंकू मंडल, डॉ. शुभम लंजे, डॉ. पायल रहांगडाले, डॉ. स्नेहल खोब्रागडे यांचेसह आरोग्य कर्मचारी अनुजा लांजेवार, शितल गोस्वामी, माया बोरकर, एस.आर. राठोड, डि.के. सोनटक्के, एस.एच. भोयर, एल.डी. पटले, विष्णू डहारे, हिना वावरे, भंडारकर, शिवानी भोयर, व्हि.डी. भांडारकर, अलका पटले, एस.एम गोंडाने, मंदा शिवणकर, गायत्री मेंढे, मनीषा मेश्राम, रोहिणी मोहनकर, एस.आर. राठोड, वेदप्रकाश पांडे व रामदाली यांना जिल्हास्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाला आरोग्य विभाग, राष्ट्रीय आरोग्य अभियान, के.टी.एस. शासकीय सामान्य रुग्णालय, बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय ई. कार्यालयाचे वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, आरोग्य कर्मचारी, कार्यक्रम समन्वयक यांचेसह डॉ. विकास विंचुरकर, डॉ. सुशांकी कापसे, डॉ. मिना वट्टी, डॉ. सुवर्णा उपाध्याय, जिल्हा माध्यम व विस्तार अधिकारी विजय आखाडे, जिल्हा आय.ई.सी. अधिकारी प्रशांत खरात उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. निरजंन अग्रवाल व आभार प्रदर्शन डॉ. मिना वट्टी यांनी केले. यशस्वीतेसाठी प्रशांत बन्सोड, मिलिंद नंदागवळी, व्हो.बो. शेंडे, कल्याणी चौधरी, रविंद्र श्रीवास यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button