
कोरची : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, कोचिनारा येथील प्रांगणात १५ ऑगस्ट रोजी भारताचा स्वातंत्र्यदिन सोहळा मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शा.व्या.स अध्यक्ष किशोर कराडे, शा.व्या.स. उपाध्यक्ष रत्नमाला सहारे, सरपंच सुनिता मडावी, उपसरपंच रुपराम देवांगन, शाळेच्या मुख्याध्यापिका मंदा आवारी, ग्रापं सचिव दामोदर पटले, विशेष अतिथी म्हणून आनंद चौबे, हिवराज कराडे, समशेरखान पठाण, टेमलला देवांगन, प्रशांत कराडे, नंदु सिन्हा, मारोती सहाळा, शाळेचे विद्यार्थी व शिक्षक वृंद तसेच संपूर्ण ग्रामवासी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरवातीला कर दाताच्या ईश्वर चिट्ठीने नंबर लावून सौ. रुख्मिणी खोबा यांच्या शुभ हस्ते ग्रामपंचायत कोचिनारा येथील ध्वजारोहण कार्यक्रम पार पाडण्यात आले व शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर कोचिनारा येथील मुख्य चौकातील ध्वजारोहण पोलीस पाटील श्रावण घावडे यांच्या शुभ हस्ते पार पाडण्यात आले. त्यानंतर शाळेतील ध्वजारोहण मंदा आवारी यांच्या शुभ हस्ते पार पडले. आकाशात फडकणाऱ्या झेंड्याला सलामी देत राष्ट्रगीत, राज्यगीत व झेंडा गीत मुलांनी सादर केले. सोबतच हर घर तिरंगा अभियान अंतर्गत झेंडा प्रतिज्ञा व तंबाखूजन्य पदार्थ्यांचे सेवन न करणे बाबत शपथ घेण्यात आली.
उपस्थित सर्व पाहुण्यांचे स्वागत शिक्षक व विद्यार्थ्यांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांनी, विद्यार्थ्यांना व जमलेल्या गावकर्यांना मार्गदर्शन केले. ग्रामपंचायत कोचिनारातर्फे इयत्ता 10 वी व 12 वी वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र, शिल्ड, शाल व रोख रक्कम देवून पाहुण्यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्य सादर केले. विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी आनंद चौबे यांनी प्रत्येक टीमला प्रोत्साहनपर बक्षिस दिले. शेवटी सर्व उपस्थित विद्यार्थी व पाहुण्यांना खाऊ वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन लोकचंद जमदाळ यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रकाश चिलबुले यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी बोगा सर, मडावी सर, अंगणवाडी सेविका यांनी सहकार्य केले. देशभक्तीपर नारे लावून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



