गडचिरोलीविदर्भ

गोंडवाना सैनिकी विद्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रम

गडचिरोली : स्थानिक गोंडवाना सैनिकी विद्यालयात 15 ऑगस्ट रोजी स्वतंत्र दिनानिमित्य आजादी का अमृत महोत्सव शीर्षकाखाली विद्यालयात विविध कार्यक्रमाची मेजवानी विद्यार्थ्यासाठी आयोजित करण्यात आली होती.

तीन दिवस चाललेल्या या उत्सवात 12 ऑगस्ट रोजी विद्यालयातील सर्व कार्यचार्यांच्या वतीने गडचिरोली शहरातुन बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. तर 13 ऑगस्ट रोजी सर्व एनसीसी कॅडेट्सच्या वतीने पदयत्रा काढून जनजागृती करण्यात आली.

15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन विद्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाल ध्वजारोहक म्हणून प्राचार्य संजीव गोसावी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य ओमप्रकाश संग्रामे, राकाँ जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर जिल्हाध्यक्ष, रायुकाँ जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर, डॉ. अविनाश शंखदरबार, राजेंद्र सोनटक्के, ग्रंथपाल कमलाकर आखाडे, ग्रामीण बँकेचे सहाय्यक व्यवस्थापक प्रदीप सुन्दुरकर, अजय वानखेडे उपस्थित होते. ध्वजारोहणची संपूर्ण धुरा सैनिकी निदेशक ऋषि वंजारी, नामदेव प्रधान व भूपेन्द्र चौधरी यांनी सांभाळली. ध्वजारोहण नंतर मान्यवरांचे हस्ते विद्यार्थ्यांना मिठाईचे वितरण करण्यात आले.

78 वा स्वतंत्र दिन अमृतमहोत्सवानिमित्त देशभक्तीपर गितगायन स्पर्धेचेही यावेळी आयोजन करण्यात आले. यामध्ये चार हाऊस जुनिअर व सिनिअर गटात ही स्पर्धा पार पडली. जुनिअर गटात भगत सिंग हाउस प्रथम, चंद्रशेखर आझाद हाउस द्वितीय तर सिनिअर गटामधे विर सावरकर यांच्या गान्याला प्रथम तर चंद्रशेखर आझाद हाउसला द्वितीय पारितोषिक प्राप्त झाले. स्पर्धेचे परीक्षण झाडीपट्टी रंगभूमी वडसाचे उत्कृष्ट गायक दिवाकर बारसागडे व महेश मैंद यांनी केले

यावेळी संजीव गोसावी व ओमप्रकाश संग्रामे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व शुभेच्छाही दिल्या. संपूर्ण कार्यक्रमचे संचालन योगेश आसमवार, गजानन अनमुलवार यांनी केले तर आभार शाहिद शेख यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button