गडचिरोलीचंद्रपूरविदर्भ

नमोशुद्र, पोंड, क्षत्रिय, राजवंशीय बंगाली समाजाला महाराष्ट्रात अनुसूचित जातीचे आरक्षण द्या

माजी खा. अशोक नेते यांची फग्गन सिंह कुलस्ते यांच्याकडे मागणी

गडचिरोली : महाराष्ट्रातील बंगाली समाजातील नमोशुद्र, राजवंशीय, क्षत्रिय, पोंड या जातींना इतर राज्यात अनुसूचित जाती (SC) चे आरक्षण मिळते. भारतीय संविधानीक अनुसूचित जातीच्या केंद्रीय यादीत वरील बंगाली जाती समाविष्ट आहेत. महाराष्ट्रातही वरील बंगाली जातींना अनुसूचित जातीचे आरक्षण द्यावे अशी मागणी माजी खा. अशोक नेते यांनी एससी, एसटी कल्याण संबंधी समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष फग्गन सिंह कुलस्ते यांच्याकडे केली आहे.

फग्गन सिंह कुलस्ते चंद्रपूर दौऱ्यावर आले असता त्यांची भेट घेऊन माजी खा. अशोक नेते यांनी मागणी केली. यावेळी प्रकाश गेडाम, प्रकाश दत्ता, सुनील बिश्वास उपस्थित होते. दिल्ली स्तरावर आपण बंगाली समाजातील वरील जातींना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असे आश्वासन फग्गन सिंह कुलस्ते यांनी यावेळी दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button