
कोरची : जवळील बेडगाव वनपरिक्षेत्र हद्दीतील क्षेत्रात 23 ऑगस्ट रोजी सकाळी 8.00 वाजता मौजा गडेली गावालगत असलेल्या कक्ष क्रमांक 456 मध्ये अस्वलीच्या हल्ल्यात दोन जण जखमी झाल्याची घटना घडली. चम्मा पंडी नैताम (वय 55) रा. गडेली, महादू सिताराम कोरेटी (वय 58) रा. गडेली अशी जखमींची नावे आहेत.
चम्मा पंडी नैताम हे गंभीररीत्या जखमी झाले. त्यांच्या डोक्याला, उजव्या उजवा हाताला तसेच डाव्या पायाला गंभीर जखमी जखम्या झाल्या आहेत. तर महादू सिताराम कोरेटी यांच्या उजव्या हाताला किरकोळ स्वरुपाची जखम झाली आहे. घटनेची माहिती मिळताच गडेली गावात जावून दोन्ही इसमांना इसमाना शासकीय वाहनाव्दारे उपजिल्हा रुग्णलय कोरची येथे औषधोपचाराकरिता भरती करण्यात आले. चम्मा नैताम हे गंभीर जखमी असल्याने त्यांना पुढील उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे नेण्यात आले आहे.
दुसऱ्या घटनेत रामसिंग पलटन सोनकुकरा (वय 55) वर्ष रा. टेमली यांच्यावर अस्वलीने हल्ला करून जखमी केले. सदर घटना ही शेत मालकाच्या शेताला लागुन असलेल्या जंगलामध्ये घडली. त्यांच्या पाठीवर दोन ठिकाणी जखमा झाल्या आहेत. त्यांना उपजिल्हा रुग्णालय, कोरची येथे औषोधोपचाराकरिता नेण्यात आले.
घटनास्थळी वनपरिक्षेत्र अधिकारी एल.एम. ठाकरे, क्षेत्र सहाय्यक एस.एन. राठोड, वनरक्षक एस.बी. भिमटे, गडेली, वनरक्षक पी. एम. मगरे, जितेंद्र राउत उपस्थित होते.
सध्या जंगलात मोठ्या प्रमाणात बांबू वास्ते व मशरुम उगवलेले आहेत. लोक सकाळच्या सुमारास वास्ते व मशरुम तोडण्याकरीता जातात. जंगलात अस्वल तसेच इतर हिंस्त्र प्राण्यांचा वावर आहे. याव्दारे नागरिकांना आवाहन करण्यात येते की, हिंस्त्र प्राणी असलेल्या भागात वास्ते व मशरुम तोडण्याकरीता जाऊ नये. तसेच योग्य खबरदारी घ्यावी.
– एल.एम. ठाकरे, वनपरिक्षेत्र अधिकारी, बेडगाव



