
चंद्रपूर : गडचांदूर शहरातील मेन बाजारपेठमधील मे. जिलानी किराणा व एजन्सी यांच्या दुकानातून सर्रास सुगंधित तंबाखूची विक्री होत असल्याची माहिती मिळताच सापळा रचत जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथील राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम व अन्न व औषधी प्रशासनाच्या संयुक्त पथकाने त्या दुकानात, गोडावून तसेच घरी धाड टाकून तब्बल २१६.१ किलोग्रॅम वजनाचा सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला आहे. या कारवाई सुंगधित तंबाखू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
ही कारवाई अन्न व औषधी प्रशासन चंद्रपूर अन्नसुरक्षा अधिकारी गिरीश सातकर, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूरच्या जिल्हा सल्लागार डॉ. श्वेता सावलीकर, समुपदेशक मित्रांजय निरांजने, सामाजिक कार्यकर्ता तुषार रायपुरे यांच्यामार्फत करण्यात आली.



