गडचिरोलीविदर्भ

महात्मा गांधी महाविद्यालयात करिअर कट्टा अंतर्गत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा

माहिती तंत्राच्या सर्व साधनांचा विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी वापर करता आला पाहिजे - यशवंत शितोळे

आरमोरी : स्थानिक महात्मा गांधी कला विज्ञान व स्वर्गीय नसरुद्दीन पंजवानी वाणिज्य महाविद्यालय, आरमोरी येथे प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य माहिती तंत्रज्ञान विभाग, महाविद्यालयातील रोजगार मार्गदर्शन विभाग आणि स्टुडन्ट कॅपॅसिटी बिल्डिंग कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली. यावेळी मंचावर महाराष्ट्र राज्य माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.  चंद्रकांत डोर्लीकर, रोजगार मार्गदर्शन विभाग आणि स्टुडन्ट कॅपॅसिटी बिल्डिंग कमिटीचे प्रमुख प्रा. पराग मेश्राम, प्रा. डॉ. प्रियदर्शन गणवीर, डी.जी.  म्हशाखेत्री, आशिष तिवारी उपस्थित होते.

यावेळी प्रमुख मार्गदर्शक यशवंत शितोळे यांनी विद्यार्थ्यांच्या करिअर संदर्भात माहिती व तंत्रज्ञान साधनांचा आपल्या अभ्यासात नेमकेपणे फायदा कसा करून घ्यावा आणि स्पर्धा परीक्षेत यश संपादन करण्यासाठी विविध ग्रंथालय, अत्याधुनिक संसाधने यांचा योग्य वापर कसा करावा याची सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांशी प्रश्नोत्तराद्वारे संवाद साधून प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली. जिल्हा पोलीस भरती, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या  परीक्षा यातील विविध विभागातील पदांची निर्मिती, त्यांच्या परीक्षा, त्यांच्या तारखा आणि यशस्वीतेचा मार्ग समजून सांगितला.

कार्यशाळेचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत डोर्लीकर यांनी प्रमुख मार्गदर्शकाच्या सूचनांचे पालन करून विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करून यश संपादन करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. पराग मेश्राम यांनी केले. संचालन करून आभार डॉ.  प्रियदर्शन गणवीर यांनी मानले. कार्यक्रमास भूगोल विभागाचे डॉ. विजय गोरडे, प्राध्यापक दिलीप घोनमोडे, प्रा. डॉ. मनोज ठवरे यांनी सहकार्य केले.  महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापिका त्याचबरोबर सर्व शाखेतील विद्यार्थीसुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button