गडचिरोलीविदर्भ

२६ ऑगस्टला तेली समाजाचा मेळावा

मेळाव्याच्या नियोजनासाठी बैठक संपन्न

गडचिरोली : तेली समाज बांधव व आमदार डॉ. देवराव होळी मित्र परिवार यांच्या वतीने भव्य तेली समाज मेळावा, जेष्ठ नागरिक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन २६ ऑगस्ट रोजी दुपारी २.०० वाजता सेलिब्रेशन फंक्शन हॉल चामोर्शी रोड गडचिरोली येथे करण्यात आले आहे.

त्यानिमित्त २४ ऑगस्ट रोजी इंदिरा गांधी चौक येथिल शासकीय विश्रामगृह येथे तेली समाजाचे प्रमुख पदाधिकारी यांची नियोजनात्मक बैठक महाराष्ट्र प्रांतीक तैलीक महासंघ गडचिरोली जिल्हाध्यक्ष इंजि. प्रमोद पिपरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

बैठकीला जिल्हा संघटक रमेश भुरसे, जिल्हा सचिव मुक्तेश्वर काटवे, तेली समाज आघाडी महिला जिल्हाध्यक्ष लता कोलते, जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोठारे, जिल्हा उपाध्यक्ष गोपीनाथ चांदेवार, मधुकर भांडेकर, गजानन बुरांडे, चेतन कोलते, एम.डी. चलाख, वसंत सातपुते, दिलीप चांदेवार, पद्माकर पिपरे, विलास नैताम, रमेश बोधलकर, लालाजी सातपुते व तेली समाजातील अनेक मान्यवर, पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button