क्राईमगडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

पिकअप वाहनातून गोवंशाची तस्करी ; ९ लाखांचा मुद्देमाल जप्त

तिघे पोलिसांच्या ताब्यात

गडचिरोली : पिकअप वाहनांमध्ये गोवंशांना निदर्यपणे कोंबून कत्तलीसाठी त्यांची वाहतूक करीत असताना धानोरा पोलिसांनी गोडलवाही फाट्‌याजवळून तीन जणांना ताब्यात घेतले. याप्रकरणी गोवंश आणि वाहनांसह ९ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

२६ ऑगस्ट रोजी सकाळी गोडलवाही येथून गडचिरोलीच्या दिशेने दोन पिकअप वाहनांमध्ये गायी आणि बैलांना कोंबून कत्तलीसाठी त्यांची वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती मिळताच धानोरा पोलिस ठाण्यातील पोलिसांनी गोडलवाही फाट्‌याजवळ पाळत ठेवली. समोरुन येणाऱ्या दोन्ही वाहनांची तपासणी केली असता त्यात ६ बैल आणि ८ गायी आढळून आल्या. पोलिसांनी १ लाख १५ हजार रुपये किमतीचे गोवंश आणि ८ लाख रुपये किमतीची दोन पिकअप वाहने ताब्यात घेतली. याप्रकरणी पोलिसांनी प्रतीक बांबोळे, रा. उसेगाव, ता. सावली, भुवन सोनुले (३७), रा. सावली, गोलू फाले, रा. पारडी, ता. सावली यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.

ही कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, अपर पोलिस अधीक्षक एम. रमेश, उपविभागीय पोलिस अधिकारी जगदीश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली धानोराचे पोलिस निरीक्षक स्वप्नील धुळे, उपनिरीक्षक चैत्राली भिसे, सुमित चैवले, सहायक फौजदार टेंभुर्णे, हवालदार गावडे, रवींद्र मडावी, बोरकुटे, मानकर, चंद्रशेखर मैंद, शशिकांत मडावी यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button