गडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची इरफानभाई पठाण यांच्या निवासस्थानी भेट

गडचिरोली : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी ०६ सप्टेंबर रोजी आलापल्ली येथे झालेल्या सभेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे १९९९ ला तत्कालीन सिरोंचा विधानसभा क्षेत्र सध्याच्या अहेरी विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना करणारे इरफानभाई पठाण यांच्या आलापल्ली येथील निवासस्थानी सस्नेह भेट दिली. त्यांच्या शासकीय दौऱ्यामध्ये जवळपास आठ मिनिटांची भेटीची वेळ असताना सुद्धा उपमुख्यमंत्री पवार यांनी जवळपास 35 मिनिट इरफान भाई व त्यांच्या परिवारासोबत वेळ घालवला. त्यांनी आपुलकीने त्यांच्या आईंच्या तब्येतीची विचारपूस केली तसेच इरफान भाई यांच्या धर्मपत्नी यांच्यासोबत सुद्धा चर्चा केली.

महाराष्ट्राच्या सगळ्यात अतिदुर्ग व नक्षलग्रस्त भागात वयाच्या 26 व्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना करणारे व घड्याळ या चिन्हाला या अतिदुर्गम आदिवासी भागात पोहोचविणारे हे इरफान भाईच होते. 1999 ला झालेल्या लोकसभा व विधानसभेच्या एकत्रित निवडणुकीची त्यांनी धुरा सांभाळली आणि निवडणुकीपासून कोसो दूर असलेल्या दीपक आत्राम यांना पहिल्यांदाच राजकारणात शरदचंद्र पवार यांच्याशी भेट घेऊन आमदारकीचे तिकीट खेचून आणलेले हे इरफान भाई होते. त्यावेळेला धर्मरावबाबा आत्राम हे अवघ्या 283 मतांनी निवडून आले, या सगळ्याची जाण ठेवून आज पवार कुटुंबातील व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अजितदादा पवार हे आठ मिनिटांचा वेळ या इरफान भाई यांच्या घरी सस्नेह भेटीचा ठेवला होता. परंतु त्यांच्या घरी गेल्यावर जवळपास 35 मिनिट अजित पवार वेळ घालविला.

या 35 मिनिटात अजित पवार यांनी इरफान भाई यांच्या आईच्या सुद्धा तब्येतीची विचारपूस केली. तसेच त्यांच्या पत्नीशी सुद्धा चर्चा केली. इरफान भाई यांचे कामकाज राजकीय कार्य यावर सुद्धा चर्चा केली. या भेटीदरम्यान  महिला आयोगाच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश महिला अध्यक्षा रूपाली चाकणकर व मंत्री धर्मरावबाबा आत्राम तसेच इरफान भाईचे अनेक सहकारी उपस्थित होते.

इरफान भाई यांच्या घरी झालेल्या राजकीय चर्चेमध्ये डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांना निवडणूक निवडून आणण्याचे जबाबदारी तुला घ्यावी लागेल असे अजित पवार यांनी आवर्जून सांगितले.

इरफान भाई यांच्यासारखे नेते किंवा कार्यकर्त्यांच्या घरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सस्नेह भेट दिल्यामुळे कार्यकर्त्यात उत्साह निर्माण झाला. या अगोदरही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी वनमंत्री बबनराव पाचपुते, आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित तसेच ज्येष्ठ नेते व महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री यांनी सुद्धा इरफानभाई पठाण यांच्या घरी भेट दिली आहे. 1999 ला अवघ्या 283 मतांनी विजय झाल्यानंतर धर्मरावबाबा आत्राम यांनी स्वतः इरफान भाई यांना आपल्याकडे घेऊन स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात धर्मरावबाबा आत्राम आणि इरफानभाई पठाण विश्वासाची अतुट जोडी निर्माण झाली हे उल्लेखनीय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button