
गडचिरोली : गणेश चतुर्थीच्या शुभ पर्वावर माजी खा. अशोक नेते यांच्या गडचिरोलीतील निवासस्थानी गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्राचे खा. डॉ. नामदेवराव किरसान यांनी सदिच्छा भेट दिली. भेटीदरम्यान दोघांमध्ये गप्पा-गोष्टी रंगल्या.
यावेळी मा. खा. तथा भाजपा अनु.जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांनी खा. डॉ. नामदेवराव किरसान यांच्याशी हस्तांदोलन करत एकमेकांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, सामाजिक नेते राजु कात्रटवार, रमेश चौधरी, रजनीकांत मोटघरे, नद्दीम नाथानी, तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



