
गडचिरोली : राज्य शासनाने ५ सप्टेंबर रोजी भारतीय वनसेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. काही अधिकाऱ्यांची बदली केली तर काहींची पदोन्नतीने पदस्थापना केली.
यामध्ये वडसा वन विभागाचे उपवनसंरक्षक धर्मवीर दगडू सालविठ्ठल यांचाही समावेश आहे. त्यांची प्रशासकीय बदली अहमदनगरच्या उपवनसंरक्षकपदी करण्यात आली आहे. सालविठ्ठल हे उपवनसंरक्षक सुवर्णा माने यांची जागा घेतील. तर सालविठ्ठल यांच्या जागी अहेरीचे उपविभागीय वनाधिकारी वरुण बी. आर. यांची पदस्थापना करण्यात आलेली आहे. उपवनसंरक्षक वरुण यांच्यासमोर वडसा वनविभागातील प्राणी हल्ले व हत्तींचा धुडगूस रोखण्याचे आव्हान आहे.



