गडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

खोट्या सह्यांची मोहीम राबवून भाजपाला निवडणुकीत पराभूत करण्याचे षडयंत्र – आ. डॉ. देवराव होळी

विरोधकांच्या भूलथापांना बळी न पाडण्याचे जनतेला आवाहन

लोकसभा निवडणुकीपूर्वी ही अशाच खोट्या सह्यांच्या आधार घेवून पक्षाचा घात

गडचिरोली : गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील माझे विरोधक मला विधानसभेची उमेदवारी मिळू नये याकरिता मोठ्या प्रमाणावर खोट्या सह्या दाखवून माझ्या विरोधात अपप्रचार करीत आहेत. लोकांकडून खोट्या सह्या करून घेत वरिष्ठ पातळीवर माझ्या विरोधात षडयंत्र करीत आहेत. अशा सह्यांचा आधार घेऊन खोटे बोलून पक्षाची व जनतेची फसवणूक करीत आहेत. त्यामुळे जनतेने अशा लोकांपासून सावध सावध राहावे व सह्या करिता आपल्याकडे आल्यास त्यास विरोध दर्शवावा, असे आवाहन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले आहे.

लोकसभा निवडणूक पूर्वी ही अशाच प्रकारे खोट्या सह्यांची मोहीम राबवून आपल्याच पक्षाची फसवणूक जिल्ह्यातील काही आपल्याच नेत्यांनी केली आहे. त्याचा परिणामही आपल्याला लोकसभा निवडणुकीत दिसून आला आहे. मूळ भाजपा विरोधी मानसिकता असलेल्या काही पदाधिकाऱ्यांनी पुन्हा विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी तशीच रणनीती तयार केली असून त्या माध्यमातून काँग्रेस व विरोधी पक्षाच्या लोकांना ताकद देण्याचे काम सुरू आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या विचाराच्या लोकांनी अशा खोट्या व बेजबाबदार असणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या आमिषाला, भूलथापांना बळी न पडता तटस्थ उभे राहावे व त्यांचा कडाडून विरोध करावा असे आवाहन आ. डॉ. होळी यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले आहे.

पत्रकार परिषदेला विधानसभा समन्वयक प्रमोद पिपरे, माजी जि.प. अध्यक्ष रवी ओल्लालवार, बंगाली आघाडीचे सुरेश शहा, महामंत्री मधुकर भांडेकर, महामंत्री बंडू झाडे, विवेक बैस, यश गण्यारपवार, टीकाराम गावतुरे, यशवंत झरकर आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button