गडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

अखेर भामरागड वनविभागाअंतर्गत वनपरिक्षेत्र कसनसुर येथील चार वन कर्मचाऱ्यांचे निलंबन रद्द

राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणय खुणे यांच्या पाठपुराव्यास यश

गडचिरोली : वनविभाग भामरागड अंतर्गत वनपरिक्षेत्र कसनसूर येथील चार वन कर्मचाऱ्याना रस्ता बांधकामामध्ये रस्त्याच्या कडेला ठेकेदारद्वारे नाली खोदकाम केल्यामुळे निलंबित करण्यात आले होते. अखेर त्या चार वनकर्मचाऱ्यांचे निलंबन रद्द करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांचे निलंबन रद्द करण्यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार संगठन (असो.) चे प्रदेशाध्यक्ष प्रणय खुणे यांच्या पुढाकाराने पाठपुरावा करण्यात आला होता.

प्राप्त माहितीनुसार, वनविभाग भामरागड अंतर्गत वनपरिक्षेत्र कसनसूर येथील चार वन कर्मचाऱ्यांना रस्ता बांधकामामध्ये रस्त्याच्या कडेला ठेकेदारद्वारे नाली खोदकाम केल्यामुळे निलंबित करण्यात आले होते. सदर कामाचा वनगुन्हा दाखल करण्यात आला होता. संपूर्ण महाराष्ट्रात एटापल्ली तालुका हा नक्षलग्रस्त व अतिदुर्गम म्हणून ओळखला जातो. देश स्वतंत्र होऊन सुद्धा गावाला जाण्याकरिता रस्ते नाही. सदर गावे हे मुलभूत सोयी-सुविधेपासून वंचित आहेत. रस्त्याच्या विकासकामाकरिता कर्मचाऱ्याचे निलंबन करणे हि कार्यवाही योग्य नाही. सदर कार्यवाही हि मानवाधिकारचे हनन आहे. जर विकासकामामध्ये कर्मचाऱ्यांना निलंबन करणे म्हणजे कर्मचाऱ्यांचे मानसिक संतुलन बिघडवणे खच्चीकरण करणे होय. या वन कर्मचाऱ्यांना पूर्ववत नोकरीमध्ये सामावून घेण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने करण्यात आली होती.

कामामध्ये कर्मचाऱ्यांचे निलंबन करणे ही बाब अन्यायकारक असून मानवाधिकार संघटना अश्या कर्मचाऱ्यांवर होत असलेला अन्याय सहन करणार नाही. याची दक्षता घेऊन सदर निलंबन तातडीने रद्द करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने मंत्री राज्याचे मत्स्य, वने व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, माजी खा. अशोक नेते व इतर मान्यवर यांच्याकडे करण्यात आली होती. मागणीची दखल घेऊन राज्य सरकारने सदर चारही वनकर्मचाऱ्यांचे निलंबन राज्य सरकारने नुकताच रद्द केले. याबद्दल जिल्ह्यातील वन कर्मचारी यांच्यामध्ये आनंद व्यक्त केले जात आहे व सर्वत्र राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणय खुणे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

याबद्दल राष्ट्रीय मानवधिकार संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ता ज्ञानेंद्र विश्वास, विदर्भ अध्यक्ष जावेद अली, जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, जिल्हा उपाध्यक्ष मुन्ना दहाडे, पुरुषोत्तम गोबाडे, देवानंद खुणे, कृष्णा वाघाडे, महिला आघाडी अध्यक्ष मनिषा मडावी, लक्ष्मी कन्नाके, तेजस्विनी भजे, मनीषा आत्राम, शितल चीकराम, भामरागड तालुका अध्यक्ष भीमराव वनकर, स्वप्निल मडावी, सुरज हजारे, पदाधिकारी/कार्यकर्ते यांनी मानवाधिकार संघटनेचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button