गडचिरोलीविदर्भ

सिद्धी उपाध्ये जिल्हास्तरीय पुरस्काराने सन्मानित

गडचिरोली : केवळरामजी हरडे महाविद्यालय, चामोर्शी येथील विद्यार्थिनी सिध्दी हेमंत उपाध्ये हिला गोंडवाना विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभ व १३ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने जिल्हास्तरीय पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल विद्यापीठाने सन्मानित केले. जो तिच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) मधील दोन वर्षांच्या उत्कृष्ट सेवेचा परिणाम आहे.

सिद्धी हिला वर्ष २०२३-२४ चा जिल्हास्तरीय उत्कृष्ट NSS स्वयंसेवक पुरस्कार मिळाला आहे. याप्रसंगी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु प्रशांत बोकरे, रजिस्ट्रार हिरेखन व NSS संचालक श्याम खंडारे यांनी सिध्दीला सन्मानित केले.

सिद्धी हिने यशोदीप संस्थेचे अध्यक्ष अरुण हरडे, प्राचार्य बनपूरकर व एनएसएस कार्यक्रम अधिकारी डॉ. पवन नाईक आणि महाविद्यालयातील सर्व कर्मचारी यांचे मार्गदर्शन व सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button