क्राईममुख्य बातमीविदर्भ

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार ; पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

यवतमाळ : पतीपासून विभक्त झालेल्या महिलेला प्रेमजाळ्यात ओढून लग्न करण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर विश्वासात घेऊन अत्याचार केला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर महिलेने अवधूतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून मंगळवारी पोलिस कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. या घटनेने पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे.

इम्रान अजीज पठाण (३८, रा. बोरेले ले-आऊट) असे गुन्हा नोंद झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. तो लोहारा पोलिस ठाण्यात चालक म्हणून कार्यरत आहे. महिला २०२१ मध्ये कौटुंबिक न्यायालयात तारखेवर येत असताना तिची ओळख इम्रान याच्याशी झाली. फोनवर बोलताना मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. आयुष्यभर साथ देईल, तुझ्याशी लग्न करेल असे आश्वासन देत घाटंजी बायपासवर नेऊन महिलेच्या गळ्ळ्यात मंगळसूत्र घातले आणि अत्याचार केला. काही दिवसांनंतर मी तुझी बायको आहे. दरमहा खर्चाची मागणी करताच पोलिस कर्मचाऱ्याने भेटणे आणि बोलणे कमी केले. महिलेने इम्रान याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.

मात्र, त्याच्याकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही. मोबाइल तसेच इन्स्टावरूनही ब्लॉक केले. २०२१ ते ५ जून २०२४ या कालावधीत लग्नाचे आमिष दाखवून कारमध्ये नेत अत्याचार केल्याचा आरोप पीडितेने अवधूतवाडी पोलिस ठाण्यात दिला आहे. त्यावरून इम्रान पठाण याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. आरोपी फरार असून, त्याचा शोध सुरू असल्याची माहिती ठाणेदार नरेश रणधीर यांनी दिली. या घटनेने पोलिस दलाची प्रतिमा डागाळल्या गेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button