गडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

वर्ग 3 व 4 ची पदभरती स्थानिक पातळीवरच केली जावी – मंत्री धर्मरावबाबा आत्राम

गडचिरोली : जिल्ह्यातील युवकांनी वर्ग 3 व 4 ची भरती जिल्ह्यातच घेण्यात यावी अशी मागणी घेऊन मोर्चा काढला होता. यावर मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मंत्री आत्राम म्हणाले, गडचिरोली जिल्ह्यात वर्ग 3 व 4 ची पदभरती जिल्ह्यामध्येच घेण्यात यावी जेणेकरून स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. बाहेर जिल्ह्यातील कर्मचारी गडचिरोली जिल्ह्यात 1-2 वर्ष काम करून बदली करून घेतात यामुळे जिल्ह्यात बहुतेक जागा रिक्त राहतात. जिल्ह्याचा युवक हा सेवानिवृत्त होईपर्यंत जिल्ह्यातच सेवा देईल यामुळे रिक्तपदाचा ताण येणार नाही.

वर्ग 3 व 4 यांची पदभरती हे जिल्ह्यातच झाली पाहिजे असे माझे वयक्तिक मत आहे व ही मागणी मी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पर्यंत पोहोचविणार असे प्रतिपादन महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button