
आष्टी-आलापल्ली मार्गावरील घटना
आष्टी : अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना ९ ऑक्टोबर रोजी आष्टी-आलापल्ली मार्गावरील चौडमपल्ली वळणावर घडली. राधाकांत पुलीन मंडल (वय ३२) रा. गीताली ता. मुलचेरा असे मृतकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, मृतक हा आलापल्ली ते आष्टी या मुख्य डांबरी रस्त्याने चौडंमपल्ली मार्गे गिताली येथून दुर्गापूर येथील सासुरवाडीकडे दुचाकी क्र. एमएच ३३ एए ०५८४ ने जात असतांना चौडमपल्ली गावापासून समोर अंदाजे ५०० मिटर अंतरावरील कोणत्यातरी वळणावर अज्ञात आपल्या वाहनचालकाने ताब्यातील वाहन हयगयीने, निष्काळजीपने, हलगर्जीपणे व भरधाव वेगाने चालवून दुचाकीला समोरून जोरदार धडक दिल्याने त्याच्या डाव्या डोळ्याजवळ खोल गंभीर दुखापत झाल्याने राधाकांत जागीच ठार झाला. या संदर्भात आष्टी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालका विरुद्ध अप क्रमांक १५३/२०२४ कलम १०६ (१), २८१, ३२४ (४), भारतीय न्याय संहिता- २०२३, सहकलम १३४ (अ), १३४ (ब) १८४ मोवाका यानुसारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून पोलीस निरीक्षक विशाल काळे यांनी स्वतः मृत व्यक्तीचे पार्थीव गीताली येथे पोचविण्यास मदत केली.



