गडचिरोलीविदर्भ

महात्मा गांधी महाविद्यालयात, प्राणिशास्त्र विभागाद्वारे वन्यजीव सप्ताह साजरा

आरमोरी :सजीव सृष्टीतील प्रत्येक जीव परस्पराश्रयी आहे. हा समतोल बिघडला तर मानवी जीवन धोक्यात येईल. वन्यसंवर्धनासाठी काम करणाऱ्या प्रत्येकाने वन्यजीव रक्षणाची जबाबदारी स्वीकारणे काळाजी गरज आहे. आपल्या आयुष्यात वन्यजीवांचा किती मोठा वाटा आहे, आज केवळ ते आहेत म्हणून आपण श्वास घेऊ शकत आहोत, वन्यजीव प्राणी आणि वनस्पतीमुळे आपल अस्तित्व टिकून आहे, म्हणजे आपण त्यांच्यापासून आहोत ते आपल्या पासून नाही त्यामुळे आपल्याला ही जाणीव असणे खूप आवश्यक आहे, म्हणून वन्यजीव संवर्धन केले पाहिजे असे प्रतिपादन उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत डोर्लीकर यांनी केले.

स्थानिक महात्मा गांधी कला, विज्ञान व न. पं. वाणिज्य महाविद्यालयात प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा यांच्या मार्गदर्शनाखाली प्राणीशास्त्र विभागाद्वारे सत्र 2024-25 करिता 2 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर 2024 ला वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला. ८ ऑक्टोबर ला समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर प्राणिशास्त्र विभागप्रमुख डॉ. जयेश पापडकर, आयक्यूएसी प्रमुख डॉ. सतीश कोला, प्रा. निखिल बोरोडे, प्रा. सुनंदा कुमरे, प्रा. धम्मदीप सहारे उपस्थित होते.

यावेळी प्रा. डॉ. सतीश कोला यांचेही समयोचित मार्गदर्शन झाले. त्यांनी वन्यजीवन संरक्षणाचे महत्त्व पटवून दिले आणि विद्यार्थ्यांना पर्यावरण रक्षणाच्या दिशेने पुढाकार घेण्याचे आवाहन केले. प्राणिशास्त्र विभागप्रमुख डॉ. जयेश पापडकर यांनी आपल्या प्रास्ताविकातून मनुष्य व वन्यजीवांचे नाते परस्पर संबंधित असल्यामुळे जनतेने वन्यप्राण्यांचे संवर्धन केले पाहिजे असे सांगितले.

या सप्ताहादरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये वन्यजीवनावर आधारित चित्रप्रदर्शन, वन्य जीवन सप्ताह यावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा, एक दिवसीय अभ्यास दौरा, त्यामध्ये वघाळा या गावी पक्षी निरीक्षण व अभ्यास, चामोर्शी येथील कृषी महाविद्यालयाला भेट, कोलकत्ता मत्स्यसंवर्धन विभागाला भेट, व्याख्याने यांचा समावेश होता. या उपक्रमांचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वन्यजीवन संरक्षणाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि निसर्गाचे महत्त्व पटवून देणे हा होता. शेवटी वन्यजीव सप्ताह यावर आधारित प्रश्नमंजुषा मधील विजेत्यांना प्रमाणपत्र आणि पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे संचालन प्राणीशास्त्र विभागातील विद्यार्थिनी दिव्या बावणे आणि आभार महेक सोनटक्के हिने मानले. या व्याख्यानाचा प्राणीशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. विद्यार्थी आणि शिक्षकांनी यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button