
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त विशेष पुस्तक प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. ज्ञान स्त्रोत केंद्र आणि क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले अभ्यास केंद्र यांच्या संयुक्त उपक्रमात ही प्रदर्शनी 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आली.
या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट्य विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी यांच्यामध्ये वाचन संस्कृती रुजवणे हे होते. या पुस्तक प्रदर्शनीत अनेक लोकांनी आपल्या आवडत्या पुस्तकांचे प्रदर्शन केले. तसेच, आपल्या आवडत्या पुस्तकांबद्दलचे विचार आणि अनुभव लेखांच्या माध्यमात व्यक्त केले.
ज्ञानस्त्रोत केंद्राच्या संचालक डॉ. रजनी वाढई यांनी यावेळी विद्यापीठाच्या वतीने गडचिरोलीकरांना पुस्तकांशी जुळून राहण्याचे आणि वाचन करण्याचे आवाहन केले. तसेच मानवशास्त्र विभागाचे डीन डॉ. श्याम खंडारे, वरिष्ठ प्राध्यापक डॉ. धनराज पाटील, डॉ. जोशी, सर्व विभागाचे प्राध्यापक आणि विद्यार्थी यांनी या प्रदर्शनीत उत्साही सहभाग घेतला. सर्वानी भारत रत्न, मिसाइल मॅन, भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना स्मरण करून त्यांच्या प्रतिमेवर पुष्पांजली अर्पण केली. जनसंचार विभागाचे प्राध्यापक डॉ. मो. सरफ़राज़ अंसारी यांनी उपस्थित लोकांना आपले पुस्तक ‘स्वामी विवेकानंद का आध्यात्मिक संचार’ या पुस्तकाची ओळख करून दिली.



